वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संसद भवनाच्या (US Parliament House, Capitol Hill) बाहेर एका संशयिताने हल्ला घडवून आणला. यावेळी संसदेच्या बाहेर असलेल्या दोन पोलीस जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.  तर दुसऱ्या पोलिसांची परिस्थिती स्थिर आहे. या पोलिसांनी दोन हात करताना यात हल्ला करणारा संशयित कार चालक ठार झाला आहे. पोलिसांच्या कारवाईत त्यालाही गोळ्या घालण्यात आल्या. संसद भवनाच्या बाहेर सुरक्षेचे बॅरिकेड तोडत कार चालकांने दोन पोलिस अधिकाऱ्यांना चिरडले. यानंतर सुरक्षेसाठी कॅपिटल आवारात बंदी (Lockdown)घालण्यात आली आहे. कर्मचार्‍यांना आत किंवा बाहेरही पडण्याची परवानगी नाही.

ओळख उघड करण्यास नकार


Capitol Hill Police कार्यकारी प्रमुख वाय पिटमॅन यांनी सांगितले की, जखमी अधिकाऱ्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक होती. जखमी झाल्यावर नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत कारचालकाचाही रुग्णालयात मृत्यू झाल्याचे त्यानी सांगितले. तथापि, पिटमन सांगितले की, अधिकारी आणि मारेकरी कार चालकाची ओळख उघड केलेली नाही. दरम्यान, अधिकाऱ्यांनी ही घटना दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर शुक्रवारची घटना आणि 6 जानेवारी रोजी झालेल्या दंगलींचा याच्याशी काही संबंध नाही, असे स्पष्ट केले आहे.

Trump समर्थकांडून गोंधळ  


कार अपघात आणि गोळीबाराची घटना कॅपिटल हिल (Capitol Hill) जवळील एका चौकशी पोलीस चौकीवर झाली. ही घटना गेल्या 6 जानेवारीला कॅपिटल हिलमध्ये डोनाल्ड ट्रम्प समर्थकांद्वारे घातलेल्या गोंधळाची आठवण करुन दिली. त्यामुळे सुरुवातीला गोंधळ उडाला होता. मात्र, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळत शांतता राखली. दरम्यान, हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा अमेरिकेचे अध्यक्षपदावर जो बिडेन यांच्या विजयाच्या संदर्भात मतदान करीत होते. यावेळी कॅपिटल पोलीस अधिकारी ब्रायन सिक्निक यांच्यासह पाच जण ठार झाले होते.

मोठी Police Force तैनात


अधिकाऱ्यांनी सांगितले की,  कार चालकाकडे चाकू होता असे दिसून आले. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात कार चालक जखमी झाला होता, त्यानंतर  त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याचा मृत्यू झाला. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कॉंग्रेस कार्यालयाच्या आसपासचे रस्तेही बंद  करण्यात आले आहेत. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.