वॉशिंग्टन : India भारत आणि China चीन मुद्द्यावर आपण मध्यस्ती करण्यास तयार असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याच्या घडीला चीनबाबत मोदी 'चांगल्या मूड'मध्ये नसल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची जागतिक राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सध्याच्या घडीला भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. १.४ अब्ज इतकी लोकसंख्या असणाऱ्या या दोन्ही राष्ट्रांचं सैन्यबळ कमालीचं आहे. सद्यपरिस्थितीता भारतामध्ये असंतोष आहे. बहुधा चीनमध्येही असंतोषाचं वातावरण आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी (फोनवरुन) संवाद साधला. चीनसोबत सुरु असणाऱ्या या मतभेदांमध्ये ते काही चांगल्या मूडमध्ये नाहीत', असं ट्रम्प गुरुवारी ओव्हल ऑफिसमध्ये म्हणाले. 


भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये मध्यस्ती करण्याच्या मुद्द्याविषयीसुद्धा त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं. भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांना मी या प्रकरणी मध्यस्ती करणं अपेक्षित असेल तर त्या पद्धतीनंही मदत करणार असल्याचं ट्रम्प म्हणाले. दोन्ही राष्ट्रांनी शांततेच्या मार्गानं या मुद्द्यावर तोडगा काढावा याकडेच ट्रम्प यांचा कल पाहायला मिळाला. 


वाचा : ...म्हणून चीन भारतासोबत मुद्दाम घालतोय वाद?


 


दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांच्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रांच्या वतीनं या मुद्द्यावर चर्चा सुरु आहेत. परिणामी सीमावादाचा हा मुद्दा चर्चेनेच निकाली निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वीच भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेला आमनासामना या मुद्द्याला आणखी गंभीर वळण देऊन गेला.