पराभव झाला तर शांततेत कार्यालय सोडून निघून जाईल - ट्रम्प
कोरोना विषाणूच्या संकटामुळे गेल्या तीन महिन्यांपासून निवडणूक रॅली बंद आहेत.
अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की या महिन्यापासून ते आपली निवडणूक सभा सुरू करणार आहेत. दरम्यान त्यांनी चर्चेत असलेल्या सर्व आशंका फेटाळून लावल्या आहेत. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये पराभव झाला तर कार्ययालय सोडून निघून जाईन. शिवाय ते असं देखील म्हणाले की पुन्हा निवडून आलो नाही तर ती अमेरिकेसाठी सर्वात वाईट गोष्ट असेल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी झालेल्या एका मुलाखती मध्ये हे वक्तव्य केलं आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे गेल्या तीन महिन्यांपासून निवडणूक रॅली बंद आहेत. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्याला सुरुवात करणार आहेत. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत, जुलैमध्ये याची अधिकृत घोषणा होईल.
दुसरीकडे डेमोक्रॅट्स पक्षाचे उमेदवार असलेले बिडेन यांनी उमेदवाराला पाहिजे तितकी मते मिळविली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की ते सुरुवातीला टेक्सास, फ्लोरिडा, रिझोना आणि उत्तर कॅरोलिना येथे निवडणूक बैठका घेतील. यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार असून 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.