अमेरिका : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कामकाजापेक्षा वैयक्तिक आयुष्यातील विचित्र वागणुकीमुळे अधिक चर्चेत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी टेक्सास आणि फ्लोरिडासह काही राज्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला. हरिकेन इरमा या वादळाने अनेक ठिकाणी नुकसान झाले, अनेकांची घरं उद्धवस्त झाली. अशा पुरग्रस्तांना भेटण्यासाठी तसेच त्यांना काही अत्यावश्यक गोष्टींचे वाटप करण्यासाठी ट्रम्प ताफ्यासह पोहचले. मात्र या वस्तू गरजवंताच्या हातात देण्याऐवजी त्यांच्यावर फेकल्या गेल्या. 




ट्र्म्पच्या या कृत्याचा एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. अमेरिकासह अनेक ट्विटरकरांनी ट्रम्पच्या या कृत्यावर टीका केली आहे.