Israel Palestine War : युद्धात पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा, `ही चूक करू नका!`
Israel Palestine War : तिथं इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणावाची परिस्थिती दर दिवसागणिक आणखी चिघळतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.
Israel Palestine War : हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील परिस्थिती इतकी बिघडली की जागतिक स्तरावरही या साऱ्याचे पडसाद उमटताना दिसले. तिथं अमेरिकेकडूनही इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांमधील युद्धावर लक्ष ठेवत वेळोवेळी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ठेत इस्रायल दौऱ्याबद्दल विचार असल्यामुळं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या.
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार बायडेन यांनी अद्यापही त्यांच्या या दौऱ्याबाबतची अधिकृत माहिती दिलेली नाही. एका मुलाखतीदरम्यान, बायडेन यांनी इस्रायल युद्ध निमानुसारच पावलं टाकणार असून निर्दोष नागरिकांना औषधोपचार, अन्न-पाणी पुरवलं याची काळजी इस्रायल घेईल असंही यडेन यांनी स्पष्ट केलं. तसेच पुढे बोलताना बायडेन यांनी इस्रायलनं दीर्घ काळासाठी एखाद्या क्षेत्रावर ताबा ठेवणं योग्य नसल्याचं वैयक्तिक मत व्यक्त केलं. या ठिकाणावर ताबा कायम ठेवण्याऐवजी इस्रायलनं हा भाग 'पॅलेस्टाईन प्राधिकरण' म्हणजेच पॅलेस्टाईन नियंत्रित प्रांत म्हणून घोषित करावा असा सल्ला बायडेन यांनी दिला.
'ही एक मोठी चूक असेल...', असं म्हणत माझ्या मते गाझामध्ये जे काही झालं ते हमासमुळं झालं आणि हमास पॅलेस्टिनी नागरिकांचं प्रतिनिधीत्वं करत नाही अशी ठाम भूमिका मांडली. इस्रायली लष्कर गाझावर हल्ल्याची तयारी करत असतानाच ही मुलाखत प्रसारित करण्यात आली. इस्रायलच्या या भूमिकेमुळं हजारो नागरिकांनी दक्षिणेकडे पळ काढला, ज्यामुळं एक मोठं मानवनिर्मित संकट ओढावलं.
गाझ्यातील रहिवाशांबद्दल काय म्हणाले बायडेन?
बायडेन यांनी मुलाखतीत सांगितल्यानुसार त्यांच्या वतीनं गाझातील नागरिकांसाठी एका सुरक्षित क्षेत्राची निर्मिती करण्यासाठीच्या चर्चा सुरु करण्यात आल्या आहेत. या युद्धजन्य परिस्थितीमध्ये महिला आणि मुलांना परिस्थितून बाहेर काढण्यासाठी इजिप्त सरकारशी चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. निर्दोष नागरिकांच्या हत्या पाहता इस्रायल आता त्यांच्याकडून शक्य ती सर्व ताकद लावताना दिसत असल्याचंही ते म्हणाले. शिवाय अमेरिकन लष्कराच्या साथीनं या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी एकही कारण दिसत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेसुद्धा वाचा : ...तर गाझा इस्रायल लष्कराची स्मशानभूमी ठरेल; इराणकडून 'आर या पार'चा इशारा
दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री होसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांनी नुकत्याच 'अल जजीरा'ला दिलेल्या मुलाखतीत इस्रायलला इशारा दिला. गाझा पट्टीमधील मुलांना लक्ष्य करणाऱ्या इस्रायलने हे हल्ले वेळीच थांबवले नाहीत तर युद्धाला नवे फाटे फुटतील अशी शक्यता इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली. त्यामुळं आता या युद्धाला पूर्णविराम केव्हा आणि कोणत्या अटीशर्तींवर मिळणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे.