अमेरिका अध्यक्ष निवडणूक : निवडणुकीत कोरोनाचा मुद्दा, महिनाभरात लस उपलब्ध - ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका महिन्यात कोरोनावरील लस येणार असल्याचं जाहीर केले आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका महिन्यात कोरोनावरील लस येणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यांनी केलेल्या या भविष्यवाणीने आश्चर्य व्यक्त केले गेले आहे. पण त्यांनी लगेच कोरोना महामारी स्वतःच निघून जाईल, असेही नमूद केले आहे. लस निर्मितीच्या अंतिम टप्प्यात अमेरिका असल्याचं त्यांनी सांगितले. पेनसिल्व्हेनियामधील टाऊन हॉलमध्ये प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
ज्यो बायडेन यांच्यावर टीका
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी कोरोना साथीचा आजार पसरलेला असतानाही मोठ्या प्रमाणात इशारा देऊनही नेवाडा मोहिमेचे आयोजन केले. ट्रम्प यांनी आपले डेमोक्रेटिक प्रतिस्पर्धी माजी उपराष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्यावर टीका केली. यावेळी, उपस्थितांनी मास्कही परिधान केले नव्हते. अमेरिकेत लाखोंच्या संख्येतं कोरोनामुळे बळी जाऊनही अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे, बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली.
ज्यो बायडेन प्रथमच फ्लोरिडात
डेमोक्रेटीक पक्षाचे ज्यो बायडेन यांनी फ्लोरिडा इथे पहिल्यांदाच प्रचारासाठी दौरा केला. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात होणाऱ्या या निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. तर, मतदारांमध्ये ज्यो बायडेन यांना पाठिंबा नसल्याची चिन्हे दर्शविली जात आहेत. बायडेन यांनी मॅम्डिल एअर फोर्स इथे गोलमेज परिषद घेण्यासाठी टांपा क्षेत्रातील काही कुटुंबियांची भेट घेतली, काही महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.