US Researchers Satellite Image Russia: रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी संशोधकांना एक हादरवून टाकणारा शोध लागला आहे. रशियाने अण्विक हल्ल्यासंदर्भातील पूर्ण तयारी केली असल्याचा पुरावाच जणू अमेरिकेच्या हाती लागला आहे. रशियामधील 9 एम 730 बुरेव्हेस्टनिक या ठिकाणाचे काही सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. ही तीच जागा आहे जिथे रशियाने अण्विक क्षेपणास्त्र सज्ज ठेवली आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अभेद्य असा उल्लेख करत ज्या क्षेपणास्त्रांचासंदर्भ दिलेला ती हीच असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.


अमर्याद क्षमता?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुतिन यांनी या शस्त्रांबद्दल बोलताना दिलेल्या माहितीच्या आधारे नाटोने या शस्त्रांची नावं एसएससी-एक्स 9 स्कायफॉल असल्याचं म्हटलं आहे. पुतिन यांच्या दाव्यानुसार या क्षेपणास्त्राची क्षमता अमर्यादित आहे. हे क्षेपणास्त्र अगदी अमेरिकेचं सुरक्षा कवचही भेदू शकतं असा पुतिन यांचा दावा आहे. मात्र पाश्चिमात्य देशांसंदर्भातील तज्ज्ञांनी पुतिन यांच्या या दाव्यासंदर्भात शंका उपस्थित केली आहे. बुरेव्हेस्टनिकसारख्या शस्त्रसज्ज ठिकाण्यांमुळे रशियाच्या समर्थ्यामध्ये वाढ झाली आहे असं म्हणणं घाईचं ठरेल. मोस्कोकडे आधी अशा गोष्टी नव्हतं असं नाहीये. उलट ही हत्यारं हाताळताना किर्णोत्सर्ग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 


कुठे आहे हे ठिकाण?


अमेरिकेच्या पॅनेट लॅबने 26 जुलै रोजी क्लिक केलेल्या फोटोंमध्ये, अण्विक शस्त्र ठेवणारं ठिकाण उभारण्यात आल्याचं दिसून आलं आहे. कमर्शिअल सॅटेलाइट कंपनी असलेल्या पॅनेट लॅबच्या या फोटोंमध्ये दिसत असलेल्या दोन ठिकाणांची नावं व्होलोगाडा-20 आणि चेबसारा अशी आहेत. या ठिकाणी अण्विक क्षेपणास्त्र म्हणजेच न्युक्लिअर मिसाईल्स तैनात करण्यात आल्या आहेत. हे ठिकाण मॉस्कोपासून 475 किलोमीटवर असल्याचं समोर आलं आहे. रॉयटर्सने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 


काय दिसत आहे या फोटोमध्ये?


या फोटोवरुन असं दिसून येत आहे की या ठिकाणी 9 लॉन्चपॅडचं बांधकाम केलं जात आहे. तीन तीनच्या गटाने हे 9 लॉन्चपॅड उभारण्यात येत आहेत. एखाद्या लॉन्चपॅडवर चुकून अपघात झाला तर त्याचा परिणाम इतर लॉन्चपॅडवर होऊ नये असा विचार करुन या लॉन्चपॅडची रचना करण्यात आली आहे. हे सर्व लॉन्चपॅड रस्त्यांनी जोडलेले आहेत. या ठिकाणी पाच अण्विक शस्त्र ठेवता येतील असे पाच बंकर्सही उभारण्यात आले आहेत. 



(फोटो रॉयटर्सवरुन साभार)


यासंदर्भात रॉयटर्सने रशिया आणि अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही, असंही रॉयटर्सने म्हटलं आहे.