मुंबई: सध्या जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: थैमान घातले आहे. अमेरिका आणि युरोपमधील देशांतील हजारो लोक यामुळे मृत्यमुखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पाश्चात्य देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या देशांमध्ये प्रत्येक दिवशी रुग्णांची संख्या १५ ते २० हजाराने वाढत आहे. परिणामी या देशांतील आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची कोरोना टेस्ट करणे, अशक्य आहे. या पार्श्वभूमीवर नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समध्ये एक वेगळाच प्रयोग होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

... तर केंद्र सरकारने आणखी नोटा छापाव्यात, अभिजित बॅनर्जींचा सल्ला

कोरोनासंदर्भात जगभरातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून या रोगाविषयी बरीच माहिती समोर आली आहे. या अभ्यासावेळी रुग्णांच्या विष्ठेमध्येही कोरोनाचे RMA चे पार्टिकल्स आढळून आले होते. त्यामुळे आता अमेरिकेत विशिष्ट भागातील सांडपाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. या माध्यमातून संबंधित परिसरात किती लोकांना कोरोनाची लागण झाली असावी, याचा अंदाज बांधला जात आहे. या माहितीच्याआधारे कोरोनाचे हॉटस्पॉट निश्चित केले जात आहेत. पूल टेस्टिंग प्रकारात ही पद्धत मोडते. 

भारतातही प्रचंड लोकसंख्या आणि टेस्टिंग किटचा तुटवडा पाहता पूल टेस्टिंग पद्धतीने कोरोनाच्या रुग्णांचा शोध घेतला पाहिजे, असे मत विख्यात समाजसेवक डॉ अभय बंग यांनी व्यक्त केले. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अभय बंग यांनी पूल टेस्टिंगची भारतात अत्यंत प्रभावी ठरेल, असे सांगितले. आगामी काळात कोरोनाचा प्रभाव कमी झाला तरी देशातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि वैयक्तिक स्वच्छतेचे नियम पाळण्याची गरज असल्याचेही यावेळी अभय बंग यांनी सांगितले.