US weather winter storm : अमेरिकेत तुफान बर्फवृष्टीमुळे होत आहे. याचा फटका मोठा बसला आहे.(winter storm)  बर्फवृष्टीमुळे 16 जणांचा मृत्यू झाला असून अमेरिकेतल्या विविध राज्यांत 7 लाख नागरिक बेघर झाले आहे. तापमानाचा  पारा उणे 45 अंशापर्यंत घसरला आहे. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तसेच विमानसेवा ठप्प पडल्याने हजारो नागरिक विमानतळावर अडकले आहेत. दरम्यान, पुढील 24 तासांत पारा आणखीन घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे  लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


अमेरिकेत दुहेरी संकट, थंडीचा कहर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कडाक्याची थंडी आणि त्यात मोठी बर्फवृष्टीने असे दुहेरी संकटामुळे अमेरिकेचे नागरिक त्रस्त आहेत. ख्रिसमसच्या उत्सावाला या बर्फवृष्टीने ब्रेक लावला आहे. या महाभयानक बर्फवृष्टीमुळे (heavy snowfall) सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हाडे गोठवणारी थंडी जाणवत आहे. उणे 45 तापमानाची नोंद झाली आहे.  शिकागो, डेन्व्हरसह अमेरिकेतील (chicago, America, Denver) अनेक शहरांमध्ये थंडीने कहर केलाय. अनेक भागात तापमान उणे खाली गेले आहे.  


बर्फवृष्टीने अमेरिका गोठली 


अमेरिकेत ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मोठे संकट उभे राहिले आहे. जोरदार हिम वादळाने संपूर्ण अमेरिकेमध्ये मोठ्याप्रमाणात तापमानात घट झाली आहे. वादळामुळे विजेच्या तारा तुटल्या असून विद्युत संकटही निर्माण झाले आहे. देशभरात 340000 हून अधिक घरे आणि उद्योगांचा विद्युत पुरवठा खंडित झालाय. आर्क्टिक स्फोट आणि हिवाळी वादळ यामुळे विध्वंसक वारा आणि जोरदार बर्फाने वीजवाहिन्या तुटल्या आणि तापमान मोठी घट झाली आहे. उणे 45 अंशसेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे अमेरिका गोठली आहे. 


थंडी इतकी वाढली आहे की, हाडे गोठली आहेत. अमेरिकेत अद्याप वादळ असूनही ईशान्येकडील भागांमध्ये जोरदार बर्फ आणि हिमवादळाच्या परिस्थिती आहे. वारे 65 मैल प्रतितास वेगाने वाहत असल्याने आणि तापमान शून्यापेक्षा कमी झाल्यामुळे शनिवारी जास्त घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.


हिमवादळाची परिस्थिती किमान रविवारी सकाळपर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे काउंटीचे कार्यकारी मार्क पोलोनकार्झ यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. हिवाळी वादळ किमान पुढील 36 तास सुरु राहू शकते, हिमवादळाचा इशारा ख्रिसमसच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहील, असे पोलोनकार्झ यांनी सांगितले.


 दरम्यान, या हिमवादळाचा तडाखा जनावरांनाही बसला आहे. आर्क्टिक प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे अर्ध्या अमेरिकेला बर्फाने वेढले गेले आहे. त्याचा परिणाम प्राण्यांवरही होत आहे. मोंटानामध्ये जनावरं थंडीपासून बचाव करण्यासाठी बर्फातून सैरावैरा पळताना दिसत आहेत. जनावरांचे गोठे, गवत पूर्णपणे बर्फाने आच्छादली गेली आहेत.