जगभरात लोकप्रिय होणार्या `या` चिमुरडीला पाहून तैमूर,मिशा,झिवालाही विसराल
तैमुर अली खान, मिशा कपूर ही बॉलिवूडमधील सेलिब्रिटी किड्स मंडळी आहेत.
मुंबई : तैमुर अली खान, मिशा कपूर ही बॉलिवूडमधील सेलिब्रिटी किड्स मंडळी आहेत. पण सध्या जगभरात या दोन स्टारकिड्सपेक्षा चार महिन्यांची एक मुलगी अधिक चर्चेचा विषय बनला आहे. तिचा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असला तरीही तिची कहाणी मात्र करूण आहे.
मुलीला पाहण्यापूर्वीच शहीद झाले 'तिचे' बाबा
अमेरिकेतील कॅरोलिनात राहणारी ब्रिट हॅरिस आई होणार या कल्पनेनेच आनंदून गेली होती. तिच्या आयुष्यात येणार्या नव्या बाळाबाबत उत्सुक होती. मात्र तिचं या जगात येण्यापूर्वीच वडीलांचं निधन होणं ब्रिटच्या मनाला चटका लावून गेले आहे.
ब्रिट हॅरिसचे पती क्रिस्टोफर हॅरिस अमेरिकन सेनेमध्ये कार्यरत होते. त्यांची पोस्टिंग अफगाणिस्तानामध्ये झाली होती. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ब्रिट गरोदर असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर क्रिस्टोफरदेखील आनंदात होता. साथीदारांसोबत त्यांनी ही 'गोड' बातमी शेअर केली आहे. मात्र ही आनंदाची बातमी समजताच अवघ्या आठवड्याभरात एका बॉम्बस्फ़ोटात त्यांचा मृत्यू झाला.
क्रिस्टोफरचे मित्र झाले ब्रिटचा आधार
क्रिस्टोफरचं निधन झाल्यानंतर ब्रिट भावनिकदृष्ट्या कमजोर झाली होती मात्र तिच्या गर्भात वाढणार्या बाळासाठी ती पुन्हा खंबीर झाली. या काळात क्रिस्टोफरच्या मित्रांनी तिला आहार दिला.
भावनिक फोटो
ब्रिटच्या आयुष्यात मुलीचं आगमन झाल्यानंतर तिने खास फोटोशूट प्लॅन केले होते. यासाठी क्रिस्टोफरच्या मित्रांना बोलावण्यात आलं आहे. सैनिकी गणवेशात क्रिस्टोफरचे मित्र ब्रिटच्या पाठीशी उभे असल्याचा एक खास फोटो शूट करण्यात आला. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.