Credit card  : दैनंदिन वस्तू खरेदीसाठी रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तींचा मेंदू स्कॅन केल्यानंतर काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, क्रेडिट कार्ड जवळ असताना आपल्या प्रत्यक्ष चलनी नोटा हाताळणं तसेच त्याचा स्पर्श ग्राहकाला जाणवत नाही. आपल्याकडे भरपूर पैसे आहेत. या विचित्र धुंदीत क्रेडिट कार्ड  वापरकर्ता राहतो.आपण किती खर्च करतोय संबधित वस्तू किती महाग आहे, याचं भान राहत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रेडिट कार्ड वापरून मिळणाऱ्या रिवार्ड्स आणि कॅशबॅकचा वापर करून पुन्हा खरेदीसाठी तयार होतात. दुसरीकडे जे लोक रोखीने व्यवहार करतात. त्यांना खर्चाचं आणि वस्तूंच्या किंमतींचं भान राहतं. एका सर्वेक्षणात ही बाब  लक्षात आहे. 


अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचा अभ्यास अहवाल प्रसिद्ध केले आहे. कोकेन किंवा इतर अंमली पदार्थ घेतल्यानंतर ज्याप्रकारची नशा एखाद्या व्यक्तीला होते. तशीच नशा क्रेडिट कार्डचा सतत वापर करताना होत असते. त्याचं वैज्ञानिक कारण या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. 


गेल्या चार-पाच वर्षांपासून भारतात डिजिटल पेमेंट्सवर भर दिला जात आहे. डिजिटल पेमेंट्समध्ये क्रेडिट कार्ड पेमेंटचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. क्रेडिट उपलब्ध झाल्यामुळे महागड्या वस्तू गरज नसतानाही क्षणिक मोहासाठी खरेदी केल्या जात असल्याचे वास्तव आहे. 


त्यामुळे या पुढचे व्यवहार विचारपूर्वक करायचे. गरजेनुसार तंत्रज्ञान वापरणे महत्त्वाचे आहे. पण त्याच्या आहारी जायचे  नाही, हे अधिक महत्त्वाचे आहे.