उट्रेक्ट : नेदरलॅंडच्या उट्रेक्ट शहरातमध्ये गोळीबारी झाली असून यामध्ये एकजण ठार झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. ट्रॉममध्ये ही घटना घडल्याचे पोलीस प्रवक्ता जूस्ट लेगशेग यांनी माध्यमांना सांगितले. एका व्यक्तीला बंदूक काढताना आणि घटनास्थळावरून धावताना आपण पाहिल्याचे एका स्थानिकाने सांगितले. तो इसम अंधाधुंद गोळीबार करताना स्थानिकाला दिसला. 24 ऑक्टोबर स्कवायर येथे ही घटना घडल्याचे पोलिसांने सांगितले. कित्येकजण यात जखमी झाले असून घटनास्थळाला घेराव घातला असल्याचेही ते म्हणाले. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.  



गुन्हेगार अजूनही फरार असल्याचे वृत्त असबर्सबर्गने दिले आहे. या विभागात ट्राम सेवा थांबवल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये दहशतवादी विचार होता हे आम्ही नाकारत नसल्याचेही ते म्हणाले. अशा घटनांशी लढण्यासाठी आम्ही टीमला सक्रिय केल्याचेही ते म्हणाले.