पृथ्वीच्या आत एका खडकात सापडला विशाल महासागर; जमिनीवरील समुद्राच्या तिप्पट पाण्याचा साठा
संशोधकांनी जगाला अचंबित करणारा शोध लावला आहे. पृथ्वीच्या आत एक विशाल महासागर सापडला आहे. या महासागरात जमिनीवरील समुद्राच्या तिप्पट पाण्याचा साठा आढळून आला आहे.
Underground Ocean : संशोधकांनी जगाला अचंबित करणारा शोध लावला आहे. पृथ्वीच्या आत 700 किमी खोलीवर एक विशाल महासागर सापडला आहे. विशेष म्हणजे या विशाल महासागरात जमीनीवरील समुद्राच्या तीप्पट पाण्याचा साठा आहे. पृथ्वीच्या भूगर्भात असलेला हा महासागर पाण्याचा आजपर्यंतचा सर्वात मोठा स्त्रोत मानला जात आहे.
हे देखील वाचा... 2025 ची सुरुवात महाभयंकर! 2043 मध्ये मुस्लिम राजवट... बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी
पृथ्वीच्या कठीण पृष्ठभागाच्या 700 किलोमीटर खालीवर रिंगवूडाइट नावाच्या खडकात हा महासागर सापडला आहे. हा भूगर्भातील महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व महासागरांच्या एकूण खंडाच्या तिप्पट असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2014 च्या वैज्ञानिक पेपर 'डीहायड्रेशन मेल्टिंग ॲट द टॉप ऑफ द लोअर मॅन्टल' मध्ये पृथ्वीच्या भूर्गभातील या महासागराच्या शोधाचा उल्लेख करण्यात आला आहे. डीहायड्रेशन मेल्टिंग ॲट द टॉप ऑफ द लोअर मॅन्टल' या रिपोर्टमध्ये रिंगवूडाइट खडकाच्या गुणधर्माचे विश्लेषण करण्यात आले आहे.
हे देखील वाचा... पृथ्वीवरील अदृष्य नदीचे पुरावे पाहून संशोधक अचंबित! 5500 वर्षापूर्वीचा रहस्यमयी इतिहास आणि भारतातील 5 राज्यांशी थेट कनेक्शन
महासागराचा शोध घेणाऱ्या टीमचे प्रमुख सदस्य भूभौतिकशास्त्रज्ञ स्टीव्ह जेकबसेन यांनी या महासागराबाबत सविस्तर माहिती दिली. 'रिंगवूडाइट खडक हा पाणी शोषून घेणाऱ्या स्पंजसारखा आहे. रिंगवूडाइटच्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये विशेष गुणधर्म आहेत. यामुळेच हे हायड्रोजन शोषून घेतात आणि पाणी अडकवू ठेवतात असा दावा स्टीव्ह जेकबसेन यांनी केला आहे.
हे देखील वाचा... UFO Plane : फक्त 30 मिनीटांत दिल्लीतून अमेरिकेत पोहचणार; ध्वनीपेक्षा वेगवान प्रवास!
भूगर्भात सापडलेला हा महासागर म्हणजे पृथ्वीच्या जलचक्राचे पुरावे असल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे. पृथ्वीच्या भूगर्भात सापडलेल्या या महासागरामुळे राहण्यायोग्य ग्रहाच्या पृष्ठभागावरील द्रव पाण्याचे प्रमाण समजण्यास मदत होऊ शकते. अनेक दशकांपासून शास्त्रज्ञ संशोधन करत होते. या भूमिगत महासागराचा शोध घेण्यासाठी, यूएसमध्ये 2000 भूकंपमापकांचे विस्तृत नेटवर्क तयार करण्यात आले होते. 500 हून अधिक भूकंपांमधून निघणाऱ्या लाटांचा अभ्यास करण्यात आला. लाटा त्याच्या गाभ्यासह पृथ्वीच्या आतील थरांमधून जातात. ओलसर खडकांमधून जाताना यांची स्थिती मोठ्या पाण्याचा साठा दर्शवतो. अशा प्रकारे संशोधकांनी महासागराचा शोध लावला आहे.