बीजिंग : जगातील पहिली मानवी शीर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश मिळाल्याचा दावा करण्यात आलाय. यामुळे आधुनिक विज्ञान एक पाऊल पुढे गेलं आहे. 


चीनमध्ये एका मृतदेहाची शीर प्रत्यारोपण सर्जरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटलीचे न्यूरोसर्जन सर्जिओ कॅनेवरो आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. चीनमध्ये एका मृतदेहाची शीर प्रत्यारोपण सर्जरी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया 18 तास चालली. हि शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. 


वर्षअखेरीस जिवंत व्यक्तीवर शीर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया


डॉक्टर कॅनेवरो यांनी याबाबत ठोस पुरावे दिले नसले, तरी लवकरच परीक्षणाबाबत योग्य माहिती दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. या वर्षअखेरीस जिवंत व्यक्तीवर शीर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे. रशियन संगणकतज्ज्ञ वेलरी स्पिरिडोनोव्ह यांच्यावर ही शस्त्रक्रियी होणार आहे. 


यापूर्वी माकडावर शीर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया


स्पिरिडोनोव्ह स्नायू खराब करणाऱ्या वर्डनिंग हॉफमॅन डिजीज विकाराने ग्रस्त असून सध्या व्हिलचेअरवर आहेत. या शस्त्रक्रियेनंतर ते प्रौढ जीवनात पहिल्यांदाज आपल्या पायावर चालू शकतील असं डॉक्टरांनी सांगितलं. यापूर्वी डॉक्टर कॅनेवरो यांच्या टीमने चीनमध्ये माकडावर शीर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळेस माकड 20 तास जिवंत राहिलं होतं.