ड्रग्ज लॉर्डला हात-पाय बांधून समुद्रात जिवंत फेकलं अन् नंतर...; अंगावर शहारे आणणारा VIDEO
व्हेनेझुएलामधील तालिबान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ड्रग्ज डिलरला समुद्रात बुडवून ठार करण्यात आलं आहे. कोकेन हायजॅक केल्याने सूड काढत त्याला निर्दयीपणे ठार करण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हेनेझुएलामधील 68 वर्षीय ड्रग्ज डिलर रेनाल्डो फुएन्टेस याची कॅरेबियन समुद्रात जिवंत बुडवून हत्या करण्यात आली आहे. त्याला तालिबान नावानेही ओळखलं जात होतं. अंमली पदार्थांच्या तस्करीत अडकलेल्या रेनाल्डो फुएन्टेचे हात, पाय बांधून समुद्रात फेकण्यात आलं. या धक्कादायक घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओत रेनाल्डो फुएन्टेसला समुद्रात बुडवताना दिसत आहे. तर दुसऱ्यात बोटीत त्याचा मृतदेह पडलेला दिसत आहे. यानंतर हे कृत्य कोणी आणि का केलं? याची चर्चा रंगली आहे.
रेनाल्डो फुएन्टेस याने धाडस करत एक मोठी चोरी केली होती. त्याने कार्टेलची 450-पाऊंड कोकेनच्या शिपमेंटची चोरी केली होती. ज्याची किंमत तब्बल 10 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. यातून त्याने रोख रक्कम मिळवली होती. रेनाल्डो फुएन्टेसने ड्रग्ज समुद्रात फेकून देत आपल्या वरिष्ठांना डिलिव्हरी करण्यात अयशस्वी झाल्याचं सांगितलं होतं. यावेळी त्याने काल्पनिक तटरक्षकांचा दाखला दिला होता. पण त्याच्या सहकाऱ्यांनीच त्याचा भांडाफोड केला आणि त्याचा सगळा कट उघड पडला.
सोशल मीडियावरुन या घटनेचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये रेनाल्डो फुएन्टेसला समुद्रात फेकण्याआधी मारहाण केल्याचं दिसत आहे. तसंच हात पाय बांधून तोंड पाण्यात बुडवून ठार केल्याचंही दिसत आहे.
दरम्यान रेनाल्डो फुएन्टेसला मृत्यूदंड देणारे नेमके कोण आहेत हे स्पष्ट झालेलं नाही. एकजण व्हिडीओत आपला चेहरा दिसणार नाही याची काळजी घेण्यास सांगत असल्याचं ऐकू येत आहे. मात्र या हत्येमागील कारण स्पष्ट झालं आहे. कोकेनची चोरी केल्याची बदला घेण्यासाठीच ही शिक्षा देण्यात आली.
डॉमिनिकन रिपब्लिकमधील बनावट राष्ट्रीय ओळख दस्तऐवजाच्या आधारे रेनाल्डो फुएन्टेसला हा फ्युएन्टेस मिगुएल फुल्कर या नावाने जगत होती. त्याने एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगले. एका प्रख्यात वकिलाला त्याने डेट केले आणि बोनाओ शहरात आपल्या मुलीची काळजी घेतली.
व्हेनेझुएलामधूनच त्याने आपल्या गुन्हेगारी आयुष्याला सुरुवात केली होती. मध्यपूर्वेतील अंमली पदार्थ तस्करांशी केलेल्या बेकायदेशीर व्यवहारांमुळे त्याला 'तालिबान' असं नाव मिळालं होतं. ब्यूनस आयर्समध्ये पोलिसांच्या गोळीबारात त्याचे दोन साथीदार ठार झाले होते. बोनाओ निवासस्थानातून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केल्यानंतर त्याचा संबंध रेनाल्डो फुएन्टेसशी जोडण्यात आला होता.
14 जुलै रोजी डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये प्रवेश केल्यानंतर 68 वर्षीय रेनाल्डो फुएन्टेसचा दुर्दैवी प्रवास सुरू झाला होता. 17 जुलै रोजी त्याला कार्टेल बैठकीचे आमिष दाखवण्यात आले. यानंतर त्याचं अपहरण करण्यात आलं आणि नंतर समुद्रात टाकण्यात आलं.