A Man Have 15 Wives and 107 Kids: तुम्हाला कदाचित ही बातमी वाचून यावर विश्वास बसणार नाही. अगदी एक बायको असली तरीही घराचा आर्थिक भर कसा सांभाळायचा. बायकोचे हट्ट पुरवायचे. कधी भांड्याला भांडं लागलं की भांडणं ही होणारच. मात्र पश्चिम केनियात एक असं कुटुंब आहे ज्यामध्ये एका माणसाला तब्बल 15 बायका आहेत आणि त्यांना 107 मुलं आहेत. यांचा संसार सुखाचा चाललाय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या माणसाचं नाव आहे डेविड सकायो कलुहाना, याबाबत बोलताना ते सांगतात की, त्यांच्या सगळ्या पत्नींना वेगवेगळ्या प्रकारची कामे नेमून देण्यात आली आहेत. यामुळे त्यांच्यात कधीच भांडणे होत नाही. पुढे डेव्हिड असंही सांगतात की त्यांचा मेंदू अतिशय तीक्ष्ण आहे आणि म्हणूनच त्याला मॅनेज करायला एका पेक्षा अधिक महिलांची त्यांना गरज आहे.  


आता  हे ऐकुन तुम्ही नक्कीच चक्रावून जाल, पण हे सत्य आहे. पश्चिम केनियामध्ये राहणारे डेविड सकायो कलुहाना 61 वर्षाचे आहेत. त्यांच्या 15 पत्नी आणि 107 मुलांसोबत ते राहतात. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हे सगळेच एकाच घरात एक कुंटुब म्हणून गुण्यागोवींदाने  राहतात. एवढ्या मोठ्या कुंटुबात कोणत्याही प्रकारची भांडण होत नाही.


याबाबत माध्यमांशी बोलताना डेविड म्हणाले, मला 20 पत्नी असतील तरी काही अडचण येणार नाही. डेविड यांनी लोकल टीवी चॅनलला मुलाखत देताना सांगितले की,  जर माझ्या 20 पत्नी असत्या तरी काही अडचण नाही. माझ्यावर राजा सुलैमानचा खूप प्रभाव आहे. जसं त्यांच्या 700 पत्नी आणि 300 दासी आहेत. माझ्यादेखील जास्तीत जास्त पत्नी असाव्यात अशी माझी इच्छा आहे.


पत्नी आणि मुलांमध्ये नाही होत भांडण
एकीकडे, डेविडच्या सगळ्याच पत्नी एकमेकींसोबत खुश असतात. त्यांच्यामध्ये कधीच भांडण होत नाही, त्या सगळ्या मिळून मिसळून राहतात. त्यापैकी एक पत्नी जेसिका कलुहाना यांच्याकडुन 13 मुलं आहेत त्यापैकी 2 मुलांचा मृत्यु झाला. 


"आम्ही सगळेच शांती आणि एकतेने राहतो. माझ्या नवऱ्यावर माझे खुप प्रेम आहे, असं जेसिका म्हणजेच डेविडची पत्नी सांगते. डेविडची दुसरी पत्नी डुरीन कलुघा सांगते की, आमच्या सगळ्यांमध्ये चांगलाच समन्वय आहे त्यामुळे आमच्यात भांडणं होतं नाहीत. आम्ही कामातही एकमेकांना मदत करतो. आमच्या मुलांमध्ये कधीच भांडण झाले नाही. सर्व मुले एकत्र आनंदाने राहतात. दरम्यान तुम्ही असं काही भारतात करायला गेलात तर तुमच्यावर कायद्याने कारवाई केली जाईल याची खबरदारी घ्यावी.