पॅरिस : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पॅरिसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यासोबतच नायडू यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो यांचीही भेट घेतली. याशिवाय ट्रम्प आणि पुतीन यांचीही पॅरिसमध्ये भेट होणार आहे. पॅरिसच्या अॅलिसी पॅलेसमध्ये ही भेट होणार आहे. जी-२० परिषदेत ट्रम्प आणि पुतीन यांची अधिकृत बैठक होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस अर्जेंटिनामध्ये जी-२३ परिषद होणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या महायुद्धाला 100 वर्ष पूर्ण झाल्याने जगभरातील नेते पॅरिसमध्ये आले आहेत. उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू या कार्यक्रमात भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिनसह जगभरातील 70 नेते फ्रान्सच्या राजधानीत एकत्र आले आहेत.



फ्रान्समधील विलर्स गुसलेन शहरात आज भारतीय सुरक्षा दलाच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. भारतीय सैनिकांनी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून हे स्मारक बनवण्यात आलं आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारताने फ्रान्समध्ये बनवलेलं हे पहिलं स्मारक आहे. या स्मारकाच्या निर्माणाची घोषणा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जून 2018 मध्ये पॅरिसमध्येच केली होती.