American Airlines : गेल्या काही दिवसांपासून विमानांमधील (airplane) गैरवर्तणाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत जी व्हायरल होत आहेत. असाच विमानातील (airplane) हाणामारीचा व्हिडिओ (Fighting Video) समोर आला आहे. हा सर्व प्रकार एका प्रवासी आणि फ्लाइट अटेंडंटमध्ये (Flight attendant) झालेल्या वादानंतर घडला आहे. (Passenger attacked Flight Attendant in air)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन एअरलाइन्स (american airlines) फ्लाइट 377 मध्ये ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, अमेरिकन एअरलाइन्सच्या (american airlines) या विमानातून एक व्यक्ती लॉस एंजेलिसला (los angeles) जात होता आणि तो मेक्सिकोच्या (mexico) लॉस कॅबोस येथून विमानात चढला होता.  या व्यक्तीला फस्ट क्लासचे शौचालय वापरायचे होते. मात्र त्याला फ्लाइट अटेंडंटने (Flight attendant) नकार दिला.


फ्लाइट अटेंडंटच्या नकारानंतर तो व्यक्ती नाराज झाला आणि त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, प्रवाशाने  फ्लाइट अटेंडंटवर हल्ला केला. त्याने फ्लाईट अटेंडंटच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जोरात मारले आणि मग मागे पळत सुटला. यानंतर फ्लाइट अटेंडंटने फोनवरून त्याच्या टीमकडे याबाबत तक्रार केली.



आरोपीला विमान प्रवासासाठी बंदी


विमान लॉस एंजेलिस विमानतळावर उतरल्यानंतर काही वेळातच फ्लाइट अटेंडंटला धक्काबुक्की करणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली. एफबीआय अधिकारी आरोपीला घेऊन गेले. वृत्तानुसार, अमेरिकन एअरलाइन्स कंपनीने आरोपीला आजीवन विमान प्रवासासाठी बंदी घातली आहे.