न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला आपल्या तीन महिन्याच्या मुलीला घेऊन जाणाऱ्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अॅरडन या सध्या चर्चेचा विषय ठरल्यात. एका देशाच्या पंतप्रधानानं आपल्या बाळाला घेऊन हजर राहणं, हे महासभेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय.


अॅरडन यांच्या या निर्णयाबद्दल जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सुरक्षेच्या कारणास्तव या बाळाचं ओळखपत्रदेखील बनवण्यात आलं. यानंतर अॅरडन यांनी दिलेली प्रतिक्रियादेखील बोलकी आहे. आपण पंतप्रधान असल्यामुळं आपल्या मुलीला हा बहुमान मिळाला. पण प्रत्येक मुलाला असा बहुमान मिळावा, हे आपलं स्वप्न असल्याचं त्यांनी म्हटलंय.