COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


Trending Video : सोशल मीडिया (Social media) कधी कुठला व्हिडिओ व्हायरल होईल किंवा नेटकऱ्यांना कुठला व्हिडिओ भुरळ घालेल हे सांगता येतं नाही आहे. सध्या सोशल मीडियावर इडली सांबार रेसिपी (Idli Sambar Recipe) तयार करताना एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. भारतीय खाद्यपदार्थ त्यांच्या मसाल्यांसोबत उत्कृष्ठ चवीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मूळचा हा दक्षिण भारतातील पदार्थांने (South Indian dishes) विदेशी माणसाला देखील वेड लावलं आहे. 


असा इडली सांबार तुम्ही नक्कीच खाल्ला नसेल


युनायटेड किंगडममधील एका व्यक्तीने अलीकडेच अस्सल राजस्थानी मिर्ची वडा शिजवतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर त्या व्हिडिओकडे अनेकांचं लक्ष गेलं होतं. तसाच आता इडली सांबार बनवतानाचा व्हिडिओ यूजर्सचे लक्ष वेधून घेतं आहे. इंस्टाग्रामवर रवा इडली आणि सांबार बनवणाऱ्या यूकेच्या एका व्हिडीओने खाद्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 2.5 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. (video uk man cooks idli sambar Trending on Social media)


भारतीय पाककृतींच्या प्रेमात 



व्हायरल व्हिडिओमध्ये, यूकेचा माणूस जेक ड्रायन रवा इडली आणि सांबार शिजवताना दिसत आहे तो भारतीय पाककृतींच्या प्रेमात आहे आणि त्याचा इन्स्टाग्राम फीड त्याचा पुरावा आहे. 


जेक प्रत्येक आठवडा भारतातील एका विशिष्ट राज्याला समर्पित करतो आणि तिथून अनेक पदार्थ बनवतो. आतापर्यंत त्यांनी गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि पंजाबमधील खाद्यपदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी तामिळनाडू सप्ताहाचा एक भाग म्हणून इडली सांबार तयार केला.



नेटकऱ्यांचा तोंडाला सुटलं पाणी 


त्याने रवा इडली आणि सांबार तयार केला आणि त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला. आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना त्याची स्वयंपाकाची शैली आवडली आणि त्यांनी त्याच्या तयारीला 10/10 रेट केले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by JAKE DRYAN (@plantfuture)



इंस्टाग्राम वापरकर्त्यांना नुकतीच त्याची स्वयंपाकाची शैली आवडली आणि त्यांनी टिप्पण्यांच्या रूपात प्रेमाचा वर्षाव केला. एका यूजर्सने लिहिलं की, “ही रवा इडली कर्नाटकची डिश आहे. तू सांबार पावडर बनवण्याची पद्धत मला खूप आवडली. सांबर एकदम परफेक्ट दिसतोय"


दुसऱ्या खाद्यप्रेमीने टिप्पणी दिली आहे की, "जेव्हा गोरे लोक तुमच्यापेक्षा चांगले भारतीय पदार्थ बनवतात." दरम्यान या व्यक्तीने महाराष्ट्रीय पदार्थ जे चांगल्या चांगल्या सुगरण बायकांना जमतं नाही तो पुरण पोळी (Puranpoli ) देखील कमाल बनवली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by JAKE DRYAN (@plantfuture)


“अरे ही रवा इडली आहे, कर्नाटक सप्ताहात समाविष्ट करायला हवी होती!! असो, नेहमीप्रमाणेच अप्रतिम”.