Viral Video : स्पायडर मॅन, सुपरमॅन आणि शक्तिमान यांचे शो पाहत आपण लहानाचे मोठे झालो. स्पायडर मॅन, सुपरमॅन आणि शक्तिमान अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला काही क्षणात धावून येतात. उंच उंच बिल्डिंगवर ते झटपट चढतात. उंच बिल्डिंगवरुन पडणाऱ्यांना अलगद हातात धरून त्यांचा जीव वाचवितात. असाच एका सुपरहिरोचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया धुमाकूळ घालतो आहे. 


पाचव्या मजल्यावरून खाली पडली आणि...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक व्यक्ती आपली कार पार्किंगमध्ये लावून रस्त्यावरुन जात होता. या परिसरातील एका बँकेत तो कामाला असतो. कार पार्क केल्यानंतर या व्यक्तीला जोरदार आवाज ऐकू येतो. एक चिमुरडी 5 व्या मजल्यावरून स्टीलच्या छतवर पडली. त्यानंतर ही मुलगी पहिल्या मजल्याचा किनाऱ्यावर येऊन पडली. जसी ती मुलगी पहिल्या मजल्यावरु खाली पडायला लागली तेव्हा हा देवदूत धावत गेला आणि तिला खाली पडण्यापासून वाचवलं. 



चीनमधील झेझियांग प्रांतमधील ही घटना असून 31 वर्षीय शेन डॉन्ग तोंगजियांग असं या देवदूताचं नाव आहे. ही घटना सोशल मीडियावर सुपरहिरो नावाने व्हायरल होते आहे. Qianjiang Evening Newsला शेनने सांगितलं की, जेव्हा ही पहिल्या मजल्यावर ही पडली तेव्हा मला अंदाज नव्हता की ही 2 वर्षांची लहान मुलगी आहे. तसंच मी लकी आहे की मी या चिमुरडीचा जीव वाचवू शकलो. जर मी तिला वाचवू शकलो नसतो तर मला फार वाईट वाटलं असतं. खरंच जर शेन सुपरमॅनसारखे तिथे पोहोचले नसते तर या चिमुरडीचं काय झालं असतं. या व्हिडीओमधील लहान मुलगी जखमी झाली आहे. तिच्या पायाला आणि छातीला दुखापत झाली आहे. या मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. 



ही धक्कादायक घटनेचा व्हिडीओ स्थानिक पोलिसांनी  Weiboवर शेअर केला आहे. Weibo ही माइक्रोब्‍लॉगिंग साइट Twitterचा चीनी वर्जन आहे.