लंडन : बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. विजय माल्ल्यावर सध्या मनी लॉन्ड्रिंगची केस सुरु आहे. पण सध्या माल्ल्या दुसऱ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. विजय माल्ल्या लंडनमध्ये तिसरं लग्न करणार असल्याची चर्चा आहे. २०१६ साली माल्ल्याबरोबर पळालेल्या मुलीबरोबरच माल्ल्याचं लग्न होणार असल्याचं बोललं जातंय. या लग्नाबाबत अजून कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी मीडिया रिपोर्ट्स नुसार हे दोघं लवकरच लग्न करतील.


कोणाशी होणार विजय माल्ल्याचं लग्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंकी ललवानीसोबत विजय माल्ल्याचं लग्न होणार आहे. पिंकी ललवानी आणि विजय माल्ल्या २ मार्च २०१६ साली भारतातून लंडनला फरार झाले होते. इकोनॉमिक टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी इंग्लंडमधली त्यांची तिसरी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली.


प्रत्येकवेळी पिंकी माल्ल्यासोबत


विजय माल्ल्याच्या चांगल्या आणि वाईट दिवसांमध्ये पिंकी ललवानी त्याच्यासोबत होती. लंडनमध्ये सुरु असलेल्या खटल्यावेळीही पिंकी नेहमी उपस्थित असते. २०११पासून पिंकी विजय माल्ल्याबरोबर आहे.


विजय माल्ल्यानं दिली होती नोकरी


विजय माल्ल्यानं पिंकी ललवानीला त्याच्या किंगफिशर एअरलाईन्लसमध्ये फ्लाईट अटेंडंटची नोकरी दिली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. ललवानीला नेहमीच माल्ल्याच्या आईसोबत पाहिलं गेलं. ललवानी किंगफिशर एअरलाईन्लसमध्ये एअर हॉस्टेसही होती. तसंच किंगफिशरच्या जाहिरातीमध्येही पिंकी ललवानी झळकली होती.


माल्ल्याच्या अनेक पार्ट्यांमध्येही पिंकी ललवानी असायची. माल्ल्या ज्यादिवशी भारतातून पळाला त्या दिवशी २ मार्च २०१६ला पिंकी माल्ल्याबरोबर विमानात होती.


लिव-ईनमध्ये राहतात दोघं?


विजय माल्ल्या आणि पिंकी ललवानी लिव-इन-रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचा दावाही करण्यात येतो. माल्ल्याचं पहिलं लग्न समीरा तैयबजीसोबत तर दुसरं लग्न रेखा माल्ल्यासोबत झालं होतं.


माल्ल्यावर कोणत्या बँकांचं किती कर्ज?


एसबीआय : १६०० कोटी


पंजाब नॅशनल बँक : ८०० कोटी


आयडीबीआय बँक : ८०० कोटी


बँक ऑफ इंडिया : ६५० कोटी


बँक ऑफ बडोदा : ५५० कोटी


युनायटेड बँक ऑफ इंडिया : ४५० कोटी