कंपाला, युगांडा : एखादी स्त्री तिच्या वयापेक्षा जास्त मुलांची आई असू शकते? याचं उत्तर तुम्ही नक्कीच 'नाही' असं द्याल... पण, मरियमची कहाणी मात्र तुम्हाला तुमचे विचार बदलायला भाग पाडेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युगांडाची रहिवासी असणारी ३७ वर्षांची मरियम  नबातांजी तब्बल ३८ मुलांची आई आहे. या सर्व मुलांनी तिच्याच उदरातून जन्म घेतलाय. 


मरियमनं तिच्या पहिल्या अपत्याला जन्म दिला तेव्हा ती केवळ १३ वर्षांची होती. वयाच्या १२ व्या वर्षीच तिचा विवाह झाला होता.


'मुलं तयार करणारी मशीन'


युगांडाच्या मुकोनो जिल्ह्यातील कबिम्बिरी गावात राहणाऱ्या मरियमला स्थानिक लोक 'मुलं तयार करणारी मशीन' म्हणतात. 


मरियमनं आत्तापर्यंत सहा वेळा जुळ्या, चार वेळा तिळ्या आणि तब्बल तीन वेळा चार मुलांना एका वेळी जन्म दिलाय. 


मरियमच्या म्हणण्यानुसार, तिच्या वडिलांनाही वेगवेगळ्या महिलांपासून तब्बल ४५ मुलांना जन्म दिला होता. त्यांचेच जीन्स मरियममध्ये असल्यानं ती इतक्या मोठ्या संख्येत मुलांना जन्म देऊ शकलीय, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 


मुलांची संख्या वाढल्यानंतर चिंताग्रस्त मरियमनं डॉक्टरांचाही सल्ला घेतला होता... परंतु, डॉक्टरांनी यामुळे तिच्या जीवाला धोका होऊ शकतो, असं सांगत बर्थ कंट्रोलसाठी नकार दिला होता. परंतु, डॉक्टरांचा हा सल्ला चुकीचा होता, असंही इतर काही डॉक्टरांचं म्हणणं आहे. कुटुंब नियोजनाचे इतर पर्याय वापरून मरियम गर्भधारणा टाळू शकली असती, असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे.