सावधान! 22 महिन्याच्या मुलाच्या हातात फोन दिला आणि लाखोंचा फटका बसला
आजकाल पालक आपल्या मुलांना शांत करण्यासाठी आणि त्याचे मनोरंजन करण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देतात.
मुंबई : आजकाल पालक आपल्या मुलांना शांत करण्यासाठी आणि त्याचे मनोरंजन करण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देतात. पालक न कळत त्या लहान मुलांसमोर अशा अनेक गोष्टी करताता ज्याचे हे मुलं अनुकरण करतात. ज्यामुळे ही लहान मुलं इतकी हुशार होतात की, त्यांना स्मार्टफोन कसं हाताळायचं हे स्वत:हून कळतं. यासाठी त्या मुलांना शिकवण्याची काही एक गरज लागत नाही.
मुलं हळूहळू आपल्याला हवं असलेला व्हिडीओ लावू लागतात, फोनचा इंटरनेट बंद केलात तरी, त्यांना ते सुरु करायचं समजतं इतकी ती हुशार होतात. त्यानंतर तुम्ही अंदाजा पण लावू शकत नाही की मुलं जवळजवळ संपूर्ण फोन हाताळायला शिकतात.
तुम्हाला हे जाणून विश्वास बसणार नाही, परंतु एका 22 महिन्यांच्या मुलानं आपल्या मोबाईलवरुन आपल्या घरी फर्निचर ऑर्डर केला आहे. तुम्हाला हे पटत नसलं तरी ही खरी घटना आहे.
ही घटना U Jersey मधील आहे, येथे आईच्या फोनसोबत खेळत असताना 22 महिन्यांच्या मुलाने असे काही केले की आई-वडील चक्रावले.
आजच्या युगात कोणताही गोष्ट विकत घेण्यासाठी फारसं फिरावं लागत नाही. कारण आता संपूर्ण बाजार हातात धरलेल्या मोबाईलवर उतरला आहे. या ऑनलाइन शॉपिंगमुळे लोकांना खूप दिलासा मिळाला आहे, पण यू जर्सीच्या या पालकांसाठी ही ऑनलाइन शॉपिंग तोट्याचा सौदा ठरली.
खरं तर, न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या एका भारतीय जोडप्याने आपल्या 22 महिन्यांच्या मुलाच्या हातात मोबाईल दिला जेणेकरून तो आरामात खेळू शकेल. पण या मुलाने पालकांच्या बँक खात्यातून 1.4 लाख रुपये काढले.
प्रत्यक्षात त्यांच्या मुलांनी घरबसल्या मोबाईलद्वारे 1.4 लाखांचे फर्निचर ऑर्डर केले. याबाबत मुलाच्या पालकांना कोणतीही माहिती नव्हती. एक एक करून त्याच्या घरी फर्निचर पोहोचवले जात असल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी तर हे फर्निचर ऑर्डर केले नाही मग हे केलं कुणी? असा त्यांना प्रश्न पडला, जेव्हा त्यांनी या गोष्टी शाहनिशा केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, हा सगळा प्रकार त्यांच्या मुलामुळे घडला आहे.
सुमारे दोन वर्षांचा असलेला अयांश हा अमेरिकेत राहणाऱ्या मधू आणि प्रमोद कुमार या भारतीय जोडप्याचा मुलगा आहे. आयुशला लिहिता-वाचता येत नाही पण त्याला ऑनलाइन शॉपिंगचे पूर्ण ज्ञान आहे. मात्र, घरात कोणत्या वस्तूंची गरज आहे आणि कोणत्या नाही, हे या लहान मुलाला माहीत नाही. त्यामुळेच विचार न करता या मुलाने आईच्या फोनवरून सुमारे दीड लाख रुपयांचे फर्निचर ऑर्डर केले.
खरेतर अयांशच्या आईच्या फोनमधील विविध प्रकारचे फर्निचर ऑनलाइन शॉपिंग साइटच्या कार्टमध्ये आधीच शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. ज्याची एकूण किंमत 1.4 लाख होती. मोबाईलमध्ये खेळता खेळता अयांशने कार्टमध्ये ठेवलेले सर्व फर्निचर त्याच्या घरच्या पत्त्यावर ऑर्डर केले.
रिपोर्टनुसार, अयांशने स्क्रीन स्वॅपिंग आणि टॅपिंग त्याच्या पालकांकडून शिकला. या चुकीनंतर अयांशच्या पालकांनी त्यांच्या फोनची सुरक्षा सेटिंग्ज आणखी मजबूत केली आहेत.
ही घटना इतर पालकांसाठीही धडा आहे. लहान मुलांच्या हातात मोबाईल दिला तरी ते तुमचे काही नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे.