Panda Zoo Viral Video: बनावट आणि तकलादू वस्तू बनवण्यात चीन संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. अगदी खेळण्यांपासून इलेक्ट्रीक सामानांपर्यंत सर्वच क्षेत्रात चीनने बनावट वस्तू घुसवल्या आहेत. भारतात चीनी वस्तूंवर बंदीही घालण्यात आली आहे. पण आता चीनने हदच पार केलीय. सोशल मीडियावर चीनमधल्या एका प्राणी संग्रहालयाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ चीनच्या शानवेई प्राणी संग्रहालयाचा (Shanwei Zoo) असल्याचं सांगितलं जातंय. . व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणी संग्रहालयावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जाऊ लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल व्हिडिओत


व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत काही पर्यटक तिकिटं काढून प्राणी संग्रहालयात जातात. प्राणी संग्राहलयात पोहचल्यानंतर पांडाला पाहून पर्यटक आनंदी होतात. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकत नाही. कारण ज्या पांडाला (Panda) लोकं आलेली असतात तो पांडा अचानक भूंकायला लागतो. हे पाहून पर्यटक चांगलेच हैराण होतात.


अचानक भूंकू लागला पांडा


व्हिडिओत एका पिंजऱ्यात दोन पांडा फिरताना दिसतायत. पण अचानक एक पांडा जीभ बाहेर काढून श्वास घेताना दिसतोय, त्यानंतर तो पांडा अचानक भूंकू लागतो. यामुळे काहीतरी गडबड असल्याचं लोकांच्या लक्षात आलं. भूंकल्यामुळे हे पांडा नाही तर श्वान असल्याचं पर्यटकांना कळलं. एका पर्यटकाने याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला असून चीनच्या बोगस धोरणावर टीका केली जात आहे.


प्राणी संग्रहालयाने चूक मान्य केली


सोशल मीडियावर 'पेंटेड डॉग्स' (Painted Dogs) या नावाने हे व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शानवेई प्राणी संग्राहलयाने सुरुवातीला ही एक 'पांडा श्वान' जात असल्याचा दावा केला. पण जगभरातून टीका झाल्यानंतर ते पांडा नाही तर श्वान असल्याची चूक मान्य केली. दोन श्वानांना पांडाच्या रंगात रंगवण्यात आलं होतं, असंही त्यांनी कबूल केलं.



लोकांनी तिकिटाचे पैसे परत मागितले


प्राणीसंग्रहलायात ठेवण्यात आलेले हे श्वान चाऊ चाऊ स्पिट्ज ब्रिड जातीचे आहेत. मुख्यत: उत्तरी चीनमध्ये ते आढळतात. घोटाळा समोर आल्यानंतर संतापलेल्या पर्यटकांनी शानवेई प्राणी संग्रहालयाकडे तिकिटाचे पैसे परत मागितले. तर प्राणी संग्रहालयाकडून श्वान केवळ मनोरंजनासाठी ठेवण्याता आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.