Viral News : गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं आहे. पहिले नात्यामध्ये विश्वासघात, दोघात तिसरा आणि पुढे अशा घटनांमधून गुन्ह्याची घटना...अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिव्यांग पतीची काळजी घेण्यासाठी तिने घरात केअर टेकर ठेवा खरा पण तिने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. एवढंच नाही तर या बॉयफ्रेंडच्या (Boyfriend) मदतीने आपल्या पतीला गुलामासारख वागवलं. तब्बल चार वर्षे तिने दिव्यांग पतीचा  (Husband) छळ केला. (Viral News Extramarital affairs wife Physical relationship with care taker and harassment with handicap husband)


काय आहे नेमकं प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिपेंडेंट युके रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार,  49 वर्षीय सारा समरसेट होउचे टॉम समरसेट या दिव्यांग व्यक्तीशी लग्न केलं. लग्नानंतर दोघांचाही सुखी संसार सुरु होता. दोघेही मस्त फिरायचे, पिक्चर पाहायचे. सगळं काही अगदी छान छान होतं. मात्र काही दिवसांनी कोण जाणे पण त्यांच्यामध्ये दुरावा यायला लागला. खरं तर या दोघांच्या आयुष्यात तिसरा व्यक्तीची एन्ट्री झाली होती. हा व्यक्ती तिच्यासोबतच राहत होता.  जियॉर्ज वेब नावाचा हा व्यक्ती या जोडप्याच्या घरी टॉमची केअर टेकरचं काम पाहायचं. वेब हा टॉमची खूप चांगली काळजी घ्यायचा. पण हळूहळू तोही टॉमकडे दुर्लक्ष करायला लागला. 


बायकोही आपल्याकडे लक्ष देत नाही, तिचंही प्रेम पहिलं सारख राहिलं नाही. वेब पण पहिलेसारखी काळजी घेत नाही. कारण वेब आणि सारा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. हे दोघेही प्रेमात इतकं आकंठ बुडाले की त्यांनी टॉमकडे दुर्लक्ष कराला लागले होते. कितेक वेळा हे दोघे दिव्यांग टॉमला घरात एकटं टाकून बाहेर फिरायला जायचे. तिला जेवायला द्यायचे उपाशी ठेवायचे. घरात तासनतास कोणी कोणी नसल्यामुळे त्याला लघवी करायला घेऊन जायलाही नव्हतं. त्यामुळे त्याच्यावर पॅटमध्येच लघवी करण्याची वेळ आली. हे दोघे प्रेमात इतके वेडे झाले होते की, तो घाणीतच बेडवर पडून राहायचा. इतकंच नाही तर या दोघांनी तिला गुलामासारखं वागणूक दिली होती आणि तेही तब्बल 4 वर्ष हे सगळं ते करत होते. 


 


अशी झाली टॉमची सुटका


टॉमला वेदना असह्य झाल्या होत्या. त्याने मित्र आणि बहिणीला त्याचा त्रास सांगितला. मित्र आणि बहिणीच्या मदतीने टॉम या दोघांना घेऊन कोर्टात गेला. हे प्रकरण कोर्टात उभं राहिलं.  त्याने कोर्टात सांगितलं की, पत्नी सारा त्याला खूप त्रास द्यायची. साराला भेटण्यापूर्वी त्याचं एक चांगलं करिअर होतं. मी नॉर्मल जगायचो, मित्र मंडळी होती खूप चांगलं आयुष्य होतं. जेव्हा मी साराला भेटलो तेव्हा तीही खूप करायची माझ्यासाठी. मात्र ज्यावेळी जियॉर्ज माझी काळजी घेण्यासाठी आला. त्यानंतर आमच्यामधील नातं बदलं. 


यावर निकाल देताना न्यायाधीश विलियन एशवर्थ यांनी पत्नी सारा समरसेट होउ आणि केअर टेकर जियॉर्ज वेबला 11 वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. ते निकाल वाचताना म्हणाले की, ''टॉमला अत्यंत वाईट अवस्थेत ठेवण्यात आलं होतं. त्याला जेव आणि पाणीदेखील मिळतं नव्हतं. बाथरुमलाही जाण्यासाठी त्याला भीक मागावी लागायची. तरी त्याचा वेदना कोणी ऐकत नव्हते, हे अतिशय वेदनादायी आहे.''