फोटोतील त्या एका प्रतिबिंबामुळे गर्लफ्रेंडनं त्याला पकडलं रंगे हात!
अशी एक घटना एका व्यक्तीसोबत घडली आहे.
Couple Viral News : सध्या डेटिंग एप्स खूप जास्त सक्रिय झाले आहेत. त्याचसोबत अनेक कपल्स हे सोशल मीडियाचाही फार चांगल्या पद्धतीनं वापर करून घेतात. त्यावरच अनेक तास घालवतं असतात. कपल्स एकमेकांच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करतात अगदी फिरायला गेल्यापासून ते कुठे डेटिंगला गेल्यावरही किंवा डिनरला गेल्यावर आपले फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. (viral news girlfriend caught boyfriend from a reflextion in photo)
परंतु याचा उपयोग फसवणूकीच्या, खोटारडेपणाच्या घटना उघड करण्यासाठीही केला जाऊ शकतो एकप्रकारे सीसीटिव्ही कॅमेराच. अशी एक घटना एका व्यक्तीसोबत घडली आहे. त्याला आपल्या मैत्रीणीशी खोटं बोलणं महागात पडलं आहे. अशाच एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडला त्याचा एक फोटो पाठवला.
हा फोटो पाठवण्यामागे त्याचा काहीएक हेतू होता. त्या फोटोद्वारे तो तिला खात्री करुन देण्याचा प्रयत्न करत होता की तो त्याच्या घरीच आहे आणि दुसरीकडे कुठेच नाहीये. परंतु त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला काही सेकंदात पकडलं आणि त्याच्या या फोटोला सोशल मीडिया साईटवरुन व्हायरल केलं आहे.
खरंतर त्यानं तिला सांगितलं की तो आपल्या मित्रांसोबत टीव्हीवर काहीतरी पाहत आहे. ज्याचा फोटो त्यानं तिला पाठवला आणि त्यातून जेव्हा तिला संशय आला आणि तिनं झूम करून पाहिलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
समोर आलेल्या माहितीनुसार, टिकटॉक यूझर मेगन मेरीने तिच्या बॉयफ्रेंडने तिला पाठवलेला फोटो शेअर केला आणि त्याची पोलखोल केली. तिचा बॉयफ्रेंड कुठल्याच मित्रांसोबत नव्हता पण तो दुसऱ्या मुलीसोबत होता.
मेगन मेरीच्या बॉयफ्रेंडने टीव्ही पाहतानाचा फोटो पाठवला. परंतु जेव्हा मेगनने त्याफोटोला काळजीपूर्वक पाहिले तेव्हा तिला फोटोमधील काचेच्या कॅबिनेटवर एक प्रतिबिंब (Reflection) दिसले. तेव्हा तिने त्या फोटोला झूम करुन पाहिले असता तिला त्यामध्ये रेड वाईनचा ग्लास दिसला तसेच त्यामध्ये एका मुलीचा गुडघा देखील तिला दिसला. यानंतर तिचा बॉयफ्रेंड तिची फसवणूक करत आहे हे तिला कळलं.
मेगनने रेड वाईन तसेच फोटोमध्ये काही पुस्तके देखील दिसली. तिच्या बॉयफ्रेंडकडे कोणतीही पुस्तके नाही, त्यामुळे ते पुस्तक त्या मुलीचे असू शकते ज्या मुलीला तिचा बॉयफ्रेंड डेट करत आहे.