Viral News : सुट्टी सुरु झाली की अनेक जण आपल्या कुटुंबासह पिकनिकला (picnic) जाण्याचा प्लान आखतात. पिकनिक दरम्यान असे अनेक क्षण असतात जे आपल्या कायमचे स्मरणात राहतात. अशीच एक घटना एका तरुणाच्या आयुष्यात घडली आणि एका क्षणात त्याचं नशीबच पालटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेरीलँडमध्ये राहणारा एक तरुण आपल्या पत्नीसह सुट्टीत फिरण्यासाठी गेला होता. फिरत असतानाच त्याने सहज म्हणून एका दुकानात स्क्रॅच ऑफ लॉटरीचं तिकिट (scratch lottery ticket) खरेदी केलं. हे तिकिटाने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्या तरुणाने चक्क 2 कोटी रुपये जिंकले होते. 



रीस्टर नावाचा तरुण आणि त्याची पत्नी ओशन सुट्टीसाठी बाहेरगावी गेलो होते. फिरस्ती दरम्यान त्यांना एक लॉटरीचं दुकान दिसलं. सहज म्हणून त्या तरुणाने 10 डॉलरचं तिकिट विकत घेतलं. त्या तिकिटाचं बक्षिस होतं तब्बल 2 लाख 50 हजार डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत तब्बल 2 कोटी रुपये. 



एका क्षणात झाला करोडपती
रीस्टर याने तिकिट विकत घेतल्यानंतर त्याने स्क्रॅच केलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. 10 डॉलरच्या बदल्यात तो चक्क दोन कोटी रुपये जिंकला होता. सुरुवातीला त्याला आपण 2 कोटी जिंकल्याचा विश्वासच बसला नाही. पण दुकान मालकाने त्याला लॉटरी लागल्याचं सांगितलं. रीस्टर एका क्षणात करोडपती बनला.


पत्नीचा विश्वास बसला नाही


पत्नीला हॉटेलवर सोडून रीश्टर हॉटेलबाहेर फिरण्यास आला होता. तेव्हा त्याने हे तिकिट विकत घेतलं होतं, परत हॉटेलवर आल्यानंतर रीश्टरने आपल्या पत्नीला आपण लॉटरीमध्ये 2 कोटी रुपये जिंकल्याचा सांगितलं. सुरुवातीला यावर तिचा विश्वास बसला नाही. पण जेव्हा त्याने तिकिट दाखवलं तेव्हा तिला खात्री पटली आणि ती आनंदाने ओरडू लागली.