Trending News in Marathi : या जगात अनेक वेळा नातेसंंबंधाशी संबंधित अशा घटना समोर येतात ज्या ऐकून धक्का तर बसतोच पण नात्यांवरील विश्वासही उडतो. आपल्या जन्मानंतर घरात दिसणारी नात्यांची आपल्याला जी ओळख होते तीच आपण सत्य समजून वावरत असतो. नात्यामधील अशी एक गुंतागुंतीचं प्रकरण समोर आलंय. ज्यामध्ये आईनी तब्बल 30 वर्षांपासून मुलीपासून तिच्या खऱ्या वडिलांना लपवून ठेवलं होतं. ती ज्या व्यक्तीला आपलं वडील समजत होती त्याच खरं नातं समजल्यावर त्या मायलेकीच्या नात्यात तणाव निर्माण झाला. परदेशात डीएनए ही एक सर्वसामान्य बाब असून या मुलीनेही सहज ती टेस्ट केली आणि त्याच्या आयुष्यात वादळ आलं. (Viral News Mother 30 year secret revealed by DNA test to daughters The one who understood the father Trending News in Marathi )


आईच्या 'त्या' सत्याने लेकी गोंधळात!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीच्या जन्माच सत्य लेकीला नेमकं कसं सांगायचं या गोंधळात आई आहे. गेल्या 30 वर्षे ज्या व्यक्तीला तिची लेक वडील मानत होती तो खरं तर तिच आजोबा होता. खरं तर त्या मुलीला तिच्या जन्मदाता वडिलांबद्दल काहीच माहिती नाही. एका डीएनए टेस्टमुळे सुखी आणि आनंदी कुटुंबात वादळ निर्माण झालं. आता आपले वडील नेमकं कोण आहे आणि तिच्या आईने आजोबांना तिची वडील का सांगितले असे अनेक प्रश्न चिंता मनात खळबळ माजवत आहे. 


'वडील आजोबा असेल तर खरं वडील कोण असेल?'


मिररच्या रिपोर्टनुसार, एका 30 वर्षीय महिलेने तिच्या आयुष्यातील हे धक्कादायक सत्य सोशल मीडियावर सांगितलं आहे. यामध्ये तिने सांगितलं की, तिची मुलगी गेल्या 30 वर्षांपासून ज्या व्यक्तीला तिचे वडील मानते ते तिचे वडील नसून तिचे आजोबा आहेत. तिचे जैविक वडील हे दुसरा कोणीतरी असल्याचं तिने सांगितलं. महिलेने पुढे सांगितले की, जेव्हा तिने तिच्या पतीशी लग्न केलं तेव्हा त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती, जे मोठे झाले आहेत. पण तिला या लग्नात एक मूल हवं होतं, पण नवऱ्याने नसबंदी केल्यामुळे हे शक्य नव्हतं. अशा परिस्थितीत तिच्याकडे स्पर्म डोनेशन करणाऱ्याची मदत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी तिने विचार केला की, अनोळखी व्यक्तीच स्पर्म घेण्यापेक्षा तिने स्वतःच्या सावत्र मुलाची मदत घेण्याच ठरवलं. त्यांनी शुक्राणू दान करण्यास होकार दिला आणि त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला.


'या' सत्येनंतर लेकीच्या आयुष्यात भूकंप!


अशा प्रकारे महिलेने स्वतःच्या सावत्र मुलाच्या स्पर्म वापरुन मुलीला जन्म दिला. मात्र, कुटुंबात याबद्दल कोणालाही सांगितलं नव्हतं. तिची मुलगी ज्या व्यक्तीला आपले वडील मानत होती तो वडील होता. एवढंच नाही ज्या व्यक्तीला आपला भाऊ म्हणत होती तर खरं तर तिचा जैविक वडील होता.