`गर्लफ्रेंडसाठी काय पण,` म्हणत ब्रॉयफ्रेंडने काय केलं तुम्हीच पाहा... असे धाडस तुम्ही करु नका
आपलं Girlfriendसाठी असलेलं प्रेम व्यक्तं केलं. परंतु नंतर त्याला ते खूप महागात पडलं.
मुंबई : तुम्ही लोकांना असे बोलताना पाहिले असेल की, प्रेमात आणि युद्धात सर्वकाही मान्य असते. कारण लोकं आपल्या प्रेमासाठी काही वाटेल ते करायला तयार होतात. असच म्हणत एका प्रियकराने प्रेयसीसाठी काहीपण म्हणत, आपलं तिच्या प्रति असलेलं प्रेम व्यक्तं केलं. परंतु नंतर त्याला ते खूप महागात पडलं. कारण त्यानंतर त्याला थेट पोलीस स्टेशन गाठावं लागलं.
खरेतर त्याच्या प्रेयसीची परीक्षा सुरु होती. परंतु काही विषयात त्याची प्रेयसी खूप विक असल्याने, तिला त्या पेपरची खूप भिती वाटत होती. म्हणून मग आपलं प्रेयसीवरील प्रेम सिद्ध करण्यासाठी प्रेयकराने आपल्या प्रेयसीच्या वतीने पेपर लिहिण्याची तयारी दाखवली.
यासाठी या प्रियकराने त्याच्या मैत्रिणीसारखेच व्यवस्थित कपडे घातले आणि तिच्या नावाने परीक्षा द्यायला गेला, पण शेवटच्या क्षणी त्याची पोल उघड झाली.
स्थानिक माध्यमांच्या न्यूज पेपरच्या अहवालानुसार, ही घटना विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेदरम्यान घडली. परीक्षेच्या वेळी शिक्षकांना एका तरुणीवर संशय आला, जेव्हा त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना हे उघड झाले की, ते ज्या तरुणीशी बोलत आहेत ती, तरुणी नसुन तो एक तरुण आहे.
त्यानंतर लगेचच विद्यापीठ व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावून या प्रियकराला पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशी दरम्यान प्रियकराने सांगितले की, तो त्याच्या मैत्रिणीसाठी परीक्षा देण्यासाठी आला होता.
खादीम म्बौप (Khadim Mboup)असे या आरोपीचे नाव आहे. तो त्याच्या 19 वर्षीय मैत्रिणीचा पेपर देण्यासाठी आला होता. विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना चकमा देण्यासाठी खादीमने स्वतः मैत्रीणीचे कपडे घातले होते आणि तो मुलगी बनून आला. त्याने त्याच्या प्रेयसिचा पारंपारिक स्कार्फ, कानातले घातले आणि मेकअप केला होता. एवढेच नाही तर त्याने गर्लफ्रेंडचे अंडरगारमेंट्सही घातले होते. यानंतर त्याने परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला आणि सलग तीन दिवस असे केले, परंतु चौथ्या दिवशी तो पकडला गेला.
पोलिसांनी खादीमविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, एवढं होऊनही खादीमने आपल्या प्रेयसिला कोणतीही हानी होऊ दिली नाही. त्याने पोलिसांना सांगितले की, याचे संपूर्ण नियोजन त्यानेच केलं होते आणि मैत्रिणीला याबद्दल काहीच माहिती नाही.