Viral News: कर लागतो म्हणून अनेकदा अनेकांचा त्रागा होतो. 'इतका भलामोठा टॅक्स... अरे बापरे!' (Tax on Income) असे उद्गार तुमच्या आमच्या तोंडातूनही आले असतीलच. वस्तू आणि सेवा कर, उत्पन्नावर कर... अशा अनेक करांमुळे सर्वसामान्य ग्राहक हा त्रस्त आहे यात काही शंका नाही. त्यातून वस्तुस्थितीही अशी आहे की, आपल्याला हा कर (How to Save Tax) भरण्याशिवाय पर्यायही नाही. अशीच एक तरूणी आहे जी देखील टॅक्सला कंटाळली आहे. कराला कंटाळून तिनं चक्क आपला देशच सोडला आहे. हा प्रकार नक्की कुठला आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. नाही! हा प्रकार आपल्या इथला नाही. हे घडलंय ते आहे इटलीमध्ये! (Italy) एका तरूणीनं आपल्या उत्पन्नावर लागणाऱ्या कराला कंटाळून चक्क दुसऱ्या देशात वास्तव्य करायला सुरूवात केली आहे. (viral news social media influencer leaves country after getting high tax paid viral news in marathi)


का सोडला देश? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तरूणीचे नाव आहे मैडालीना. ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) आहे. आपल्या कमाईवर सर्वात जास्त म्हणजे 28 टक्के टॅक्स लागत असल्यानं तिनं इटली हा आपला देश सोडला आणि ती स्विर्झर्लेंडमध्ये राहायला गेली. आपल्या कमाईवर 28 टक्के टॅक्स लागत असल्यानं तिनं देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ती स्वत: एक सोशल मीडिया कॉन्टेन्ट क्रिएटर (Content Creator) आहे. तिचे सोशल मीडियावर 1.2 मिलियनहून अधिक फॉलोनर्स आहेत. ती तिच्या बोल्ड फोटोजसाठीही (Bold) ओळखली जाते. तिच्याकडे अनेक आलिशान गाड्याही आहेत. तिचीही परदेशात सोशल मीडियावर बरीच चर्चाही होते. 


कोण आहे मैडालीना? 


आपले फोटोज इन्टाग्रामवर शेअर करत ती कोट्यवधी रूपये कमावते आहे. परंतु इटलीमध्ये तिच्या या कमाईवर जास्त टॅक्स लागतो. जी ज्या देशात आता राहते आहे, म्हणजे स्विझर्लंडमध्ये (Swizerland) 1 टक्के एवढा टॅक्स आहे, असं कळतं आहे. मागच्या वर्षीच्या रिपोर्ट्सनुसार तिचे वार्षिक उत्पन्न हे 1.36 करोड रूपये एवढे आहे. ही कमाई तिनं केवळ सोशल मीडियावरून मिळवली आहे. मैडालीनाचा कॉन्टेन्ट तिच्या प्रेक्षकांकडून पाहिला जातो आहे आणि त्याचसोबत तिलाही त्यातून चांगला फायदा होता आहे. तिच्या फोटोंना आणि व्हिडीओला (video) खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळतात तसेच तिचे व्हिडीओज हे अनेकदा व्हायरलही होताना दिसतात. 


सोशल मीडियावर खूप लोकं प्रमाणात पैसे कमावताना दिसत आहेत. त्यामुळे आज ते सोशल मीडियावरील स्टार झाले आहेत. जगात आज असे लाखो इन्टाग्राम, फेसबुक इन्फ्लूएन्सर्स आहेत ज्यांनी सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे.