मुंबई : मुलं ही चुकी करत असतात आणि पालक त्यांना बऱ्याचदा समजावण्याचा प्रयत्न करतात. तर काही पालक आपल्या मुलाला शिक्षा देखील करतात जेणे करुन तो ती चुक पुन्हा करणार नाही. परंतु असे केल्याने आई-वडीलांना कधीही कोर्टाने शिक्षा दिल्याचे तुम्हा ऐकले नसाल. पण एक असा धक्कादायक प्रकार घडला आहे ,जे ऐकून तुमचा विश्वासच बसणार नाही की, असं देखील घडू शकते. तुम्ही कधी एकलं आहे का, की आई-वडील आपल्या मुलाला घाणेरडे चित्रपट पाहण्यापासून रोखले, म्हणून कोर्टाने पालकांना मोठा दंड ठोठावला? ही बातमी खरोखरच खूप धक्कादायक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण हो हे खरोखर घडले आहे. पालकांनी आपल्या मुलाकडे असलेले घाणेरड्या चित्रपटांचा संग्रह फेकून दिला म्हणून न्यायालयाने त्या पालकांना सुमारे 30 हजार 411 डॉलर म्हणजे सुमारे 22 लाख 37 हजार 316 रुपये दंड ठोठावला.


मुलाकडून पालकांवर गुन्हा दाखल


WION मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, ही  घटना अमेरिकेतील  मिशिगन (Michigan) मधील आहे. येथे रहाणाऱ्या डेव्हिड वर्किंगने त्याच्या पालकांविरोधात अमेरिकन जिल्हा न्यायालयात खटला जिंकला आहे. त्याने त्याच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल केला होता की, त्यांनी त्याचा 29 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 21 लाख 31 हजार 407 रुपये किमतीचा संग्रह फेकून दिला.


डेव्हिडचा आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर इंडियानाला शिफ्ट होण्यापूर्वी सुमारे 10 महिने तो पालकांच्या घरी राहत होता. जेव्हा तो त्याच्या आईवडिलांच्या घरातून इंडियानाला आला, तेव्हा त्याने पाहिले की, त्याच्याकडील असलेल्या घाणेरड्या (Porn video) चित्रपटांचा संग्रह हरवला आहे. त्याने खूप शोध घेतला पण त्याला ते सापडले नाही.


काही दिवसांनी, डेव्हिडच्या वडिलांनी त्याला एक ई-मेल पाठवला, ज्यात लिहिले होते की, 'डेव्हिड, मी तुझ्यासाठी खूप चांगले काम केले आणि तुला या घाणेरड्या चित्रपटांपासून मुक्ती दिली आहे.'


निकाल देताना न्यायाधीश काय म्हणाले?


या प्रकरणाचा निकाल देताना न्यायाधीश मॅलोनी म्हणाले की, यात काही शंका नाही की, डेव्हिडच्या वस्तूंना फेकून देण्यात आले आहे आणि त्याच्या पालकांनी हे स्वत: कबूल केले आहे की, त्यांनी याला फेकले आहे. त्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून 30 हजार 411 डॉलर म्हणजे सुमारे 22 लाख 37 हजार 316 रुपये दंड ठोठावला जात आहे.