Bikini Girls च्या सानिध्यात रहाणाऱ्या धर्मगुरुला 8 हजार वर्षांची शिक्षा, तब्बल 1 हजार गर्लफ्रेंड
इतिहासातील सर्वात मोठ्या शिक्षेपैकी एक, लैंगिक शोषणाबरोबरच धर्मगुरुवर अनेक गंभीर आरोप
Turkish Religious Leader Adnan Oktar Jailed: जगात अशी अनेक लोकं आहेत ज्यांचे कारनामे सामान्य माणसाच्या आकलनापलिकडे आहेत. पण अनेकवेळा आपल्याच याच कारनाम्यांमुळे त्यांना तुरुगांची हवाही खावी लागते. टर्कीतल्या (Turkish) एका इस्लामिक धर्मगुरुला (Religiou Leader) लैंगिक छळासह (Sexual Harassment) काही प्रकरणात तब्बल 8658 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. धार्मिक उपदेश देताना हा धर्मुगुरु बिकनी गर्ल्सने (Bikini Girls) वेढलेला असायचा. यावरुन इतर अनेक धर्मगुरुंनी त्याच्यावर टीका केली होती. अलिशान बंगला आणि ऐशोआरामाचं आयुष्य जगणाऱ्या या धर्मगुरुला आता आजीवन तुरुंगवास सोसावा लागणार आहे.
धर्मगुरुला 8658 वर्षांचा तुरुंगवास
टर्कीतल्या टेलिव्हिजनवर इस्लामविषयी उपदेश देणाऱ्या या धार्मिक नेत्याचं नाव अदनान ओकतार (Adnan Oktar) आहे. मीडिया अहवालानुसार इस्तांबूलमधल्या न्यायालयाने अदनान ओकतारला 8658 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आंतकवादी संघटनेला मदत करणं, लैंगिक शोषण, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, ब्लॅकमेलिंग, मनी लॉण्ड्रिंग आणि हेरगिरी करण्याचे आरोप अदनान ओकतारवर लावण्यात आले आहेत. इतिहासातील सर्वात मोठ्या शिक्षेपैकी ही एक शिक्षा आहे.
टीव्हीवर द्यायचा धार्मिक उपदेश
अदनान ओकतार हा टीव्ही चॅनेलवर इस्लामिक उपदेश देण्याचं काम करायचा. अदनान आणि त्याच्या साथीदारांविरोधात पहिला निकाल 2021 मध्ये देण्यात आला होता. पण तिथल्या उच्च न्यायालयाने तो रद्द केला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अदनाना आणि त्याच्या साथीदारांविरोधात पुन्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. ज्यामध्ये त्याच्यावर सशस्त्र संघटना चालवणं आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवण्यता आला होता.
बिकनी गर्ल्सचा असायचा वेढा
अदनान ओकतार आपल्या प्रवचनांमध्ये परंपरा आणि सनातनी विचारांबद्दल उपदेश देत असे. पण त्याच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या महिला मात्र आधुनिक आणि कमी कपड्यांमध्ये असायच्या. तो नेहमीच बिकनी गर्ल्सच्या वेढ्यात असायचा, या मुलींना त्याने 'किटन्स' असं नाव ठेवलं होतं. 66 वर्षांचा अदनान स्वत: ही आधुनिक कपडे परिधान करायचा. तो अनेकदा पार्ट्या आयोजित करत असे आणि आपल्या पार्ट्यांमध्ये देश-विदेशातील सेलिब्रिटींना आमंत्रित करत होता.
छापेमारीत 69 हजार गर्भनिरोधक गोळ्या जप्त
अदनाना याच्या जवळपास 1 हजार गर्लफ्रेंड होत्या. सुनावणीत अदनानने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अनेक महिलांनी त्याच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अत्याचार केल्यानंतर गर्भनिरोधक गोळ्या खाण्यासाठी अदनान महिलांवर जबरदस्ती करत असे. पोलिसांनी त्याच्या बंगल्यावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 69 हजार गर्भनिरोधक गोळ्या जप्त केल्या.