WEIRD NEWS : सहसा लग्नसोहळा (Wedding) म्हटलं की धम्माल, कल्ला आणि असंख्य घडामोडी असंच काहीसं चित्र पाहायला मिळतं. काही लग्नसोहळ्यांमध्ये घडणारे किस्से त्या सोहळ्याची रंगत आणखी वाढवतात तर काही विचित्र घटना विवाहसोहळ्यांना चर्चेत आणण्यास कारणीभूत ठरतात. सध्या अशाच एका विवाहसोहळ्याची चर्चा सुरु आहे. Reddit वर एका युजरनं हटके विवाहसोळ्यातील किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा वाचताना अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Reddit वर पोस्ट करण्यात आलेल्या माहितीनुसार एका विवाहसोहळ्यामध्ये वधू आणि वरानं समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांना चक्क भांडी स्वच्छ करण्याचं काम सोपवलं. नटूनथटून आलेल्या पाहुण्यांसाठी हे सारंकाही अनपेक्षित आणि तितकंच विचित्र होतं. Reddit वर यासंदर्भात माहिती देणाऱ्या युजरनुसार नवरीनं 10 महिलांना किचनमध्ये येण्याचा आग्रह केला आणि त्यानंतर त्यांना तिथं असणारी ताटं धुवायला सांगितली. काही क्षणांसाठी तर नेमकं काय सुरु आहे हेच त्या महिलांना लक्षात येत नव्हतं. 


हा विवाहसोहळा तेथील विचित्र नियोजनपद्धतीमुळं चर्चेत आला. जिथे स्वयंपाकखोलीमध्ये प्रचंड उकडत असतानाही पाहुणे मंडळी चक्क भांडी स्वच्छ करत होती, तर दुसरीकडे काही पाहुण्यांना तर लग्नाचं जेवणही मिळालं नाही. 


Viral News: सप्तपदी घेतल्यानंतर भर मंडपातून नवरी 'नौ दो ग्यारह'


 


'हे' ठरलं अडचणीचं कारण 


हे लग्न कुठे कधी आणि केव्हा घडलं यापेक्षा तिथं सुरु असणाऱ्या अनपेक्षित घटनांनमुळं ते अधिक चर्चेत आलं. या लग्नसोहळ्यामध्ये वधू- वरानं सेल्फ कॅटरिंगचा पर्याय निवडला होता. या पर्यायानुसार कार्यक्रमासाठी वापरात आणलेली भांडी स्वच्छ करुनच कार्यक्रम स्थळावरून आयोजकांना तेथून निघता येतं अन्यथा त्यांना डिपॉझिट म्हणून भरलेली रक्कम परत मिळत नाही. एकिकडे ही अडचण तर दुसरीकडे आर्थिक चणचण, अशा कात्रीत सापडल्यामुळं या जोडीनं थेट पाहुण्यांनाच विनंती करत आपल्याला हातभार लावण्यास सांगितलं. आर्थिकत गणित बिघडल्यामुळं विवाहसोहळ्यासाठी वेटर किंवा इतर कोणाचीही वाढीव मदत आपण घेऊ न शकल्यामुळं त्यांनी अगत्याचं आमंत्रण देत थेट या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांनाच कामाला लावलं.