सेंट चार्ल्स : जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस काहीह करु शकतो. आपण हे बऱ्याच वेळा ऐकले आहे, परंतु आज तुम्हाला आम्ही याचं एक उदाहरण देखील देणार आहोत. लोकं आपलं आयुष्य जगत असताना किंवा आपल्या आयुष्यातील काही गोष्टींसाठी स्वत:चं लॉजीक लावत असतात. हे लॉजीक कधी बरोबर असतात तर कधी चूक. परंतु अशाच एक लॉजीक आणि संयमाच्या मदतीने एक महिला मात्र श्रीमंतही झाली आहे. फक्त एक साधी युक्ती अवलंबून या महिलेने 2 कोटींपेक्षा जास्त पैसे कमवले.


लॉटरी जिंकण्याची सोपी युक्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तानुसार, ही महिला मिसुरीच्या लॉटरी  (Missouri Lottery) मधून दर आठवड्यात एकाच नंबरचं लॉट्रीचे तिकिट खरेदी करायची. ही प्रक्रिया तिने जवळपास तीन वर्षे चालू ठेवली. त्यानंतर या महिलेने तिच्या युक्ती आणि धैर्याच्या जोरावर, 319,500 डॉलर, म्हणजे जवळपास 2.3 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे.


सेंट चार्ल्सला रहाणाऱ्या या महिलेचे नाव  जॅकलिन बोर्नहॉप (Jacklyn Bornhop) आहे. तिने मिसुरी लॉटरीच्या (Missouri Lottery) अधिकाऱ्यांना सांगितले की, ती वर्षानुवर्षे दर आठवड्याला शो मी कॅश (Show Me Cash) मध्ये प्रवेश करत आहे आणि सेंट जून चार्ल्सच्या 13 जूनच्या ड्रॉइंगसाठी तीने त्याच नंबरची तिकिट खरेदी केली, जी ती मागील तीन वर्षांपासून खरेदी करत आहे.


तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यश


बोर्नशॉप म्हणाली की, जेव्हा तिने ड्रॉइंगनंतर त्याच्या निकाल तपासला तेव्हा तिला धक्का बसला. तिला आढळले की, तिचे पाचही क्रमांक जुळले आहेत. ती म्हणाली की, "मी हे पाहून थक्क झाले, माझ्यासाठी ते अविश्वसनीय होते. म्हणून मग मी पुन्हा पुन्हा ते तिकिट तपासले. परंतु नंतर मला विश्वास बसला की, ती लॉट्री मलाच लागली होती."