नवी दिल्ली : नवजात शिशू डॉक्टरच्या तोंडावरील मास्क काढतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. कोरोना संकटात घाबरलेल्यांना तुम्ही घाबरु नका, आता मास्क घालण्याची गरज लवकरच संपेल असा जणू संदेश हे बाळ देतंय असं फोटो पाहून वाटतंय 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटात सापडलंय. कोरोनामुळे लोकांना आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागलाय. अनेक वस्तू आपल्या जीवनाचा भाग बनल्या आहेत आणि काही जुन्या सवयी आपल्याला कायमच्या सोडाव्या लागल्यायत. यामध्येच एक म्हणजे मास्क आहे. आपण मास्कला आपल्या आयुष्यातला महत्वाचा हिस्सा बनवलाय.  कोरोनाविरोधातील लढाईत मास्क ढाल म्हणून काम करतंय. त्यामुळेच मास्कच्या किंमतीत वाढ झालीय. डिझायनर देखील वेगवेगळ्या रंगाच्या मास्क बनवू लागलेयत. यातून आपण लवकर बाहेर पडू आणि कोरोनामुक्त आयुष्य जगू याची सर्वजण वाट पाहतातय. या बाळाने देखील फोटोतून बहुदा हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय.



कोरोनामुक्तीचा संदेश 


 ५ ऑक्टोबरला इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर झाला.यामध्ये डॉक्टरच्या हातात असलेलं बाळ त्यांच्या चेहऱ्यावरचा मास्क काढताना दिसतंय. फोटो काढण्याच्या काही मिनिट आधीच हे बाळ जन्मल्याचं दिसतंय. बाळाने जगात आपला पहिला श्वास घेतला आणि जगाला आशा आहे तेच कृत्य केलंय. बाळाने जन्मताच डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील मास्क हटवलंय. हा कोरोनामुक्तीचा संदेश मानला जातोय. म्हणून हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 
 
दुबईतील डॉक्टर समरचयॅबने हा फोटो शेअर केलाय. आपल्या सर्वांची लवकरच मास्कपासून सुटका होऊ शकते असा मेसेज मिळतोय. लोक याला नवजात शिशूने दिलेला संदेश मानतायत. त्यामुळे या फोटोला खूप लाईक्स मिळतायत आणि लोक एकमेकांना शुभेच्छा देखील देतायत.