मुंबई : लोकं आपला वाढदिवस आपल्या मनाप्रमाणे साजरा करतात प्रत्येकाला असे वाटत असते की, आपला वाढदिवस आपण असा साजरा करावा की, तो सगळ्यांपेक्षा वेगळा असावा आणि तो उपस्थित सगळ्यांच्या लक्षात देखील रहावा. यासाठी मग लोकं काहीही करतात. असाच एका वाढदिवसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ पाकिस्तानमधून समोर आला आहे, या व्हिडीओमध्ये एका पाकिस्तानी influencer च्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये एका सिंहाला देखील आमंत्रण दिले गेल होते. हा सिंह या पार्टीमधील मुख्य आकर्षण बनला आहे. या सिंहाला एका सोफ्यावर साखळ्यांनी बांधून ठेवले होते.


आमचे सहयोगी wionच्या माहितीनुसार, हा व्हिडीओ या महिन्याच्या सुरूवातीला लाहोरमध्ये Influencer सुझान खानच्या (Influencer Susan Khan) वाढदिवसाच्या पार्टीत बनवला गेला होता. परंतु या व्हिडीओवर अनेक प्राणी प्रेमींकडून प्रश्व उपस्थीत केले गेले आहे.


Project Save Animals'  संस्था चालवणाऱ्या सय्यद हसन (Syed Hassan)  यांना या पार्टीत सहभागी झालेल्या एक मित्राकडून या पार्टीचा हा व्हिडीओ मिळाला आहे. हसन यांनी सांगितले की, "मी पाकिस्तानात लोकांना सार्वजनिक आणि सोशल मीडियावर वन्य मांजरी आणि प्राण्यांना दाखवताना पाहिले आहे. लोकांना अशा वन्य प्राणींना पाहून आनंद होते, हे मला फार चुकीचे वाटते."



'प्रोजेक्ट सेव्ह अ‍ॅनिमल्स' या संस्थेने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना असे लिहिले की, "अशा Influencer लोकांना लोकं मोठ्या संख्येने पाठिंबा देतात. लोकं त्यांना फॉलो देखील करतात. त्यामुळे असे लोकं आपले फॉलोवर्स वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतात. आम्ही या वाढदिवसाच्या विरोधात नाही, परंतु लोकं त्यांचा वाढदिवस कसा साजरा करतात आणि दुसऱ्यांपुढे काय उदाहरण ठेवतात हे महत्वाचे आहे. लोकं जर शोपीस म्हणून जनावरांचा वापर करत असतील तर आम्ही याच्या विरोधात आहोत."