`तिखट झेपत नाही तर...` हॉटेलमधले नियम वाचून खवय्यांच्या तोंडचं पाणी पळालं
Viral Restaurant Notice on Spicy Food: सध्या एका रेस्टोरंटमधील सूचनेनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे. सध्या हा फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
Viral Restaurant Notice on Spicy Food: रेस्टोरंट्समध्ये गेल्यावर आपल्याला नाना तऱ्हेचे अनुभव येताना दिसतात. हॉटेलमध्ये अनेक प्रकारच्या सूचना या लावलेल्या असतात. परंतु अनेकदा त्या आपल्या नजरेसमोरूनही जाताना दिसतात. सध्या अशाच एका पोस्टरची बरीच चर्चा आहे. यावेळी चक्क हा त्याचा बिझनेस पाहून खवय्यांच्या तोंडच पाणीचं पळालं आहे. त्यामुळे याची बरीच चर्चा आहे.
आपल्याला अनेकदा तिखट खाणं झेपत नाही. त्यामुळे सतत पाण्याची धार ही लागतेच. सतत तहान लागते आणि तिखट खाल्ल्यावर आपल्याला काहीतरी गोड हे खावंच लागतं. सध्या एका रेस्टोरंटमधल्या एका सूचनेनं सर्वांचेच लक्ष हे वेधून घेतले आहे. रेस्टोरंटमध्येच चक्क त्यानं नोटीस बोर्डच लावला आहे.
यात म्हटलं आहे की, ''तुम्ही तिखट खाणार असाचटेल आणि जर का तुम्हाला झेपणार नसेल तर तुम्ही ऑर्डर करू नका कारण आम्ही त्याचे पैसे तुम्हाला परत देणार नाही.'' सध्या या नोटीसमुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. या पोस्टखाली नेटकरी नानाविध कमेंट्स करताना दिसत आहेत. @NoContextBrits या X युझरनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चाही आहे. सध्या ही पोस्ट ट्विटर चांगलीच व्हायरल झाली आहे. ही पोस्ट अनेकांना रिलेटही झाली आहे. यावेळी या नोटीसमध्ये असंही लिहिलं आहे की, ''स्पाईस लेवल वॉर्निंग. 0-5 लेवल.'' त्याखाली त्यांनी खवय्यांना असं बजावलंही आहे.
हेही वाचा : करण जोहर बनवणार 'झिम्मा'चा हिंदी रिमेक? हेमंत ढोमे यांनी सांगितलं खरं काय ते...
यावेळी हा फोटो परदेशातला दिसतो आहे. रिपोर्ट्सनुसार, एका ब्रिटिश रेस्टोरंटमधला हा फोटो आहे. तेथील इंडियन रेस्टोरंटमधला हा फोटो असल्याचे समजते आहे. यावेळी नेटकऱ्यांनीही नाना तऱ्हेच्या कमेंट्सही केल्या आहेत. कुठल्याही जेवणाची चव ही कायमच निराळी असते. त्यातून तिखट जेवण हे अनेकांना खायला आवडते परंतु ते प्रत्येकाला झेपलेच असं नाही. तेव्हा अशावेळी आपण थोडंसं जपूनच खातो. शेवटी नाही म्हटलं तरी हॉटेल वाल्यांना बिझनेस हा करावाच लागतो.