Jhimma Hindi Remake: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'झिम्मा 2' या चित्रपटाची. उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपुर्वी हा चित्रपट हिंदीतही येणार अशीही बरीच चर्चा रंगलेली होती. करण जोहर या चित्रपट हिंदीतून रिमेक काढणार असल्याच्या जोरात चर्चा होत्या. त्यावर अभिनेते-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'झिम्मा 2' या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला असून आता 24 नोव्हेंबरला हा चित्रपटही प्रदर्शित होतो आहे. त्यानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांनी याचा खुलासा केला आहे. सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, सुहास जोशी, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव अशी तगडी स्टारकास्ट यात आहे.
19 नोव्हेंबर 2021 साली झिम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. 100 दिवसही या चित्रपटानं चित्रपटगृहात मुक्काम ठेवला होता. त्यामुळे या चित्रपटाची बरीच चर्चा होती. त्यामुळे हा चित्रपट हिंदी का नाही होणार? यावरील रिमेकवर लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत हेमंत ढोमे म्हणाला की, टटखरं सांगू का? ही चर्चा खरंच चालू आहे…मी स्पष्टपणे नकार देणार नाही. क्षिती आणि करण सरांनी मिळून आताच एक चित्रपट केला. त्याकाळात त्या दोघांची सुद्धा या कथेवर बरीच चर्चा झाली. त्यांची चर्चा सुरू असताना हिंदी रिमेकचे कलाकार सुद्धा निश्चित झाले आहेत असंही पसरलं पण, कलाकार कोण असतील हे अद्याप ठरलेलं नाही. यापेक्षा जास्त मी आता काहीच सांगू शकणार नाही.''
हेही वाचा : 'राजकुमार हिरानीच्या घरासमोर बसून...' शाहरुखने सांगितला 'डंकी' चित्रपट कसा मिळाला
यापुढे क्षिती म्हणाली की, ''एवढ्या लगेच हा चित्रपट हिंदीत बनवला जाणार नाही. सध्या फक्त चर्चा चालू आहे. 2024 मध्ये वगैरे हिंदी रिमेक प्रदर्शित होईल असंही काही नाहीये. ही बायकांची गोष्ट असल्याने मी कधीच हा चित्रपटाच्या रिमेकला विरोध करणार नाही. सगळ्या भाषेत चित्रपट झाला पाहिजे फक्त आमची पात्र त्यांना तेवढ्याच प्रामाणिकपणे मांडता आली पाहिजेत. तो प्रामाणिकपणा जपला, तर या सिनेमातील कलाकार आणि याची निर्माती म्हणून मला सर्वात जास्त आनंद होईल.''
सध्या स्त्रीप्रधान चित्रपट, मालिका या प्रचंड गाजताना दिसत आहेत. त्यातून या चित्रपटांनाही प्रेक्षक तूफान प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर्षी 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट 90 कोटींच्या घरात पोहचलो होता. त्यामुळे याची बरीच चर्चा होती.