viral: `जिमी जिमी आजा आजा...` चीनमध्ये व्हायरल होतंय बप्पी लहिरींचं गाणं, पण कारण काय?
आता लोकांनी सरकारचा निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे. मात्र हा विरोध वेगळ्या पद्धतीने केला जात आहे.
china people sing bappi lehari jimi jimi song : चीनच्या शून्य कोविड धोरणामुळे (zero covid policy in china) तिथले लोक खूप नाराज आहेत. यामुळे लोकांना आर्थिक संकट तर सहन करावे लागत आहे.
शिवाय त्यांना अन्नधान्याचाही सामना करावा लागत आहे. परंतु अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी 20 व्या राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत या धोरणाचा बचाव केला.
या धोरणांतर्गत देशात विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आता लोकांनी सरकारचा निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे. मात्र हा विरोध वेगळ्या पद्धतीने केला जात आहे.
लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेले लोक विरोध करताना त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.
1982 मध्ये आलेल्या 'डिस्को डान्सर' (disco dancer) या संगीतकार बप्पी लाहिरी (bappi lehari) या चित्रपटातील 'जिम्मी जिमी आजा आजा' (jimmy jimmy jimmy aaja aaja ) हे लोकप्रिय गाणे लोक वापरत आहेत.
बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि पार्वती खान यांनी गायलेले हे गाणे चीनच्या सोशल मीडिया साइट 'डोयुयिन' वर मंदारिन भाषेत 'जी मी, जी मी' गायले जात आहे.
जर आपण 'जी मी, जी मी' असे भाषांतर केले तर त्याचा अर्थ 'मला भात द्या, मला भात द्या' असा होतो.
चिनी लोकांनी 'जिमी, जिमी' वापरून विडिओ बनवून आपला त्रास जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत .
याद्वारे ते झिरो कोविड धोरणामुळे जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सांगत आहेत. चीनमध्ये, शून्य-कोविड धोरणांतर्गत शांघायसह डझनभर शहरांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले होते, ज्यामुळे लोकांना अनेक आठवडे घरात कोंडून राहावे लागले होते.