Success Story Trending News Video Viral : आज जास्त मेहनत न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज भरपूर पैसे कमवण्यासाठी इथे प्रत्येक जण धावपळ करते आहे. 37 वर्षीय तरुणीने Goldman Sachs आणि JPMorgan Chase सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने असा भन्नाट व्यवसायची निवड केली की, ती आज महिन्याला 84 लाख रुपये कमावते. (Viral Video 37 year old zoreen kabani quits JPMorgan job to sell clothes online now earns 84 lakhs a month)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तरुणीचं नाव आहे झोरीन कबानी. ती अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहते. 2022 मध्ये त्याने आपल्या करिअरमध्ये तिने अचानाक नवीन वळण दिलं. Kabani ने तिची खरी आवड जोपासण्यासाठी तिची चांगली पगाराची फायनान्सची नोकरी सोडली. तिने लहानपणमापासूनच खूप काटकसरी जीवन पाहिल आहे. त्यामुळे स्वस्त वस्तू कुठे मिळतात हे शोधून त्याची खरेदी करते. तिची ही लहानपणीची गोष्ट पुढे जाऊन आवडत तयार झाली. ती आवडीने स्वस्त वस्तूचा शोध घेऊन मग त्याची खरेदी करते. या जगात तिच्यासारखे आज अनेक जण आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन तिच्या डोक्यात नवीन व्यवसाय आला. तिला फॅनशचीही लहानपणापासून आवडतं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Zoreen (@zkstyles_official)


अशात तिने दोन्ही गोष्टींची सांगड घातली आणि तिचा व्यवसायला सुरुवात केली. त्याने ऑनलाइन कपडे विकण्यास सुरुवात केली आणि लवकरच ती एक यशस्वी व्यवसायिका बनली. तिच्या व्यवसायावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून, कबानीने दरमहा 83 लाख पेक्षा जास्त पैसे कमवते. 


फायनान्समधील पदवी पूर्ण केल्यानंतर, काबानीने 2010 मध्ये गोल्डमन सॅक्समध्ये तिची कारकीर्द सुरू केली. त्यानंतर 2013 मध्ये जेपी मॉर्गन चेसमध्ये काम केलं. एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या असतानाही तिला कधीच समाधान मिळालं नाही. एप्रिल 2022 मध्ये, तिने नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि आयुष्यात काहीतरी सर्जनशील करण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांनंतर, त्याच्या धाकट्या भावाने तिला Whatnot ॲपवर ओळख करून दिली, जिथे लोक थेट वस्तू विकू शकतात. कबानीला लवकरच ॲपच्या महिला फॅशन विभागात रस वाटू लागला आणि तिने हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Zoreen (@zkstyles_official)


एका महिन्याच्या आत त्याने स्वतःचं पेज zkstyles सुरू केलं, ज्याद्वारे तो दरमहा 83 लाख पेक्षा जास्त कमावते. तिचा पहिला लाइव्ह स्ट्रीम सुरू केल्यानंतर, काबानीने आपली कौशल्ये वापरून थ्रीफ्ट स्टोअर्स आणि क्लिअरन्स विक्रीसाठी सुमारे 50 वस्तू शोधल्या. सुरुवातीच्या प्रवाहादरम्यान तिने सुमारे 50 यूजर्सला आकर्षित केलं आणि त्यापैकी 20 ते 30 लोकांनी त्याच्याकडून खरेदी केली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Zoreen (@zkstyles_official)


सोमवार ते शुक्रवार नियमित स्ट्रीमिंग शेड्यूल करुन व्यवसायात प्रगती केली. ती केवळ विक्रीसाठी असलेल्या वस्तूंचं प्रदर्शनच करत नाही तर त्यासोबत युजर्सला फॅशन टिप्स आणि स्टाईल सल्ला देखील देते. तिच्या पहिल्याच महिन्यात तिने 10 लाखांपेक्षा जास्त कमाई केली. आतापर्यंत तिने या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 75,000 हून अधिक वस्तू विकल्या आहेत.