मुंबई : एखाद्या डोंगर सुळक्यावर चढायचं असेल तर, तुम्हीआम्ही सर्वप्रथम एखादा दोर, हार्नेस या साऱ्याची व्यवस्था करु, त्यानंतर पायात असणाऱ्या शूजची ग्रीप व्यवस्थित आहे ना, हे पाहू आणि त्यानंतरच तो डोंगर चढण्यासाठी पाय पुढे ठेवू. थोडक्यात ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हे काम बऱ्यापैकी सोपं. कधीकाळी चढाई करणाऱ्यांसाठी काहीसं कठीण. अनेकांसाठी तर ही गोष्ट म्हणजे निव्वळ अशक्य. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका साधूनं मात्र हीच अशक्य वाटणारी गोष्ट सहज शक्य करुन दाखवली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (viral video) होत आहे. या व्हिडीओमध्ये केशरी रंगांची वस्त्र अंगावर घेऊन एक साधू अतिशय सरळ असा (Monk Climbing mountain) डोंगरमाथा सहजपणे चढताना दिसत आहे. (Viral Video a Monk Climbing up a Steep Mountain Without Any Safety Harness will shock you)


वाचा : पुरातत्वशास्त्रज्ञांना 3300 वर्ष जुन्या गुहेत सापडल्या या वस्तू, पाहून तुम्हीही हैराण व्हाल


 


साधूच्या शेजारीच एक गिर्यारोहक हार्नेसचा (Mounteneer) वापर करत चढाई करताना दिसत आहे. बरं, तिथंही त्याची दमछाक झालेली दिसत आहे. असं असतानाच शेजारहून अनवाणी चढाई करणाऱ्या साधूला पाहून या गिर्यारोहकाचाही काही क्षण स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Itshimalayas (@itshimalayas)


संन्यस्त आयुष्य जगणाऱ्यांविषयी आपण खूप काही ऐकलं- पाहिलं असेल. पण, हे आयुष्य जगत असताना त्यांना काही गोष्टींवर प्राप्त होणारी महारथ नेमकी काय असते हेच या व्हिडीओतून अगदी सोप्या पद्धतीनं लक्षात येत आहे. चेहऱ्यावर शांत भाव ठेवत मनात एका अदृश्य शक्तीविषयीची आस्था ठेवत ही मंडळी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा ओलांडत असतात. त्यांच्या संन्यस्त आयुष्यात जणू काही ती अदृश्य शक्ती पावलोपावली सोबतच असते... नाही का?