Viral News: आपल्या प्रत्येकालाच कामाचे एक वेगळे असे पॅशन असते. काहींना कामातून वेगळाच असा एक आनंद (9 To 5 Job) मिळतो. कामाच्या ठिकाणी अनेकांमध्ये मतभेदही असतात. त्याचसोबत काही भांडणंही असतात. परंतु शेवटी सगळेच एकमेकांची काळजी घेत गुण्यागोविंदानं (Office Culture) राहतही असतात. त्यातून अनेकांची अशी एक धारणा असते की ऑफिसमध्ये आपली खूप लोकप्रियता वाढली पाहिजे. आपण सगळ्यांच्या नजरेत भरलं पाहिजे. तर काही आपण बरं आणि आपलं काम बरं इतपत सुखी असतात. ऑफिसमध्ये आपल्याला नानातऱ्हेची माणसं (Office Ethics) भेटतात ती कधी आपल्याला सुखावणारी असतात तर कधी ती आपल्याला फार त्रासदायकही ठरतात. ऑफिसमध्ये बॉस आणि एम्प्लोयी (Boss and Employee) यांचे एक वेगळेच नाते असते. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं काहीसे ऑफिसचे वातावरण असते. (viral video a woman blocks her boss after calling her at home during her illness viral news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्या प्रकारचे नाते आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते परंतु प्रत्येकवेळेला त्यांच्यात काहीतरी कुरघोडी असतीलच असं नाही. काहींचे नाते हे खूप सुंदर आणि सगळ्यांना आवडेल असे असते परंतु समोर आलेल्या एका बातमीनुसार, तुम्हाला बॉस आणि त्याच्या कर्मचाऱ्यामधील (Boss and Employee Relationship) एक अतरंगी नातं पाहायला मिळू शकते. यात झाले असे की आपल्या बॉसचा फोन आला आणि असं काय घडलं की त्या कर्मचाऱ्यानं चक्क त्या आपल्या बॉसला एकदमच ब्लॉक करून टाकले. चला तर मग जाणून घेऊया ही इंटररेस्टिंग गोष्ट. 


'या' व्हिडीओमध्ये तिनं काय सांगितलं? 


या ही बॉसला ब्लॉक (Employee Blocks Boss) करणारी महिला म्हणाली, मी ज्या दिवशी आजारी होते त्याच दिवशी मी माझ्या ऑफिसमधून सुट्टी (Office Leave) घेतली होती. त्यातून माझ्या बॉसनं मी ऑफिससाठी वापरत असलेल्या ऑफिशियल नंबरवरून फोन केला नाही तर त्याउलट तिनं माझ्या पर्सनल नंबरवर फोन केला जो मी माझ्या घरी वापरते. माझं म्हणणं आहे की जर तिला फोन करायचाच होता तर बॉसनं माझ्या ऑफिशियल मेलवर फोन करायला हवा होता परंतु बॉसनं माझ्या पर्सनल नंबरवर फोन केला. मी माझ्या ऑफिशियल नंबरसाठी 4 हजार रूपये महिना भरते. 


कोण आहे 'ही' महिला? 


सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे ज्यात अशाच एका महिलेनं आपल्या बॉसला ब्लॉक केलं असल्याचं ती सांगते आहे यात ती असं म्हणते आहे की, आपल्या बॉसनं आपण आजारी असताना फोन केला आणि त्यामुळे मी तिला ब्लॉक केलं असं तिनं सांगितलं. ही ब्लॉक करणारी महिला व्हॅनेसा आहे. सध्या हा व्हिडीओ युट्यूबवर व्हायरल होतो आहे.