Girlfriend Boyfriend Video : प्रेम हे या जगातील सर्वात सुंदर भावना आहे. ज्याने प्रेम केलं त्यालाच ही भावना कळते. प्रेमात एकमेकांसाठी वेडे असणारे अनेक जोडपी आपण आजूबाजूला बघितली आहेत. प्रेमात बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड एकमेकांच्या आनंदासाठी नवीन नवीन काही तरी करत असतात. कधी सप्रराईज गिफ्ट तर कधी छान डेटचं प्लॅन...प्रेमात पडलो तो दिवस, मग पहिली भेट, प्रपोज केला तो दिवस आणि वाढदिवस असे अनेक क्षण असतात जे प्रियकर प्रेयसी एकमेकांसाठी खास करत असतात. 


गर्लफ्रेंडच्या बर्थडेसाठी तो थेट...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता हेच बघा नाही सोशल मीडियावर एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. खास करुन तरुणी हा व्हिडीओ पाहून असा बॉयफ्रेंड हवा गं बाई असं म्हणतं आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक भारतीय तरुण गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी थेट न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर पोहोचतो. तुम्ही पाहू शकतो दोघे एकमेकांनाच्या गळ्यात हात घालून फोटो काढतं असतात. (Viral Video Boyfriend Reached Times Square to surprise girlfriend birthday video trending on google news)


अन् तिने मागे वळून पाहिलं तर...


तेवढ्यात ती मागे वळून पाहिते ते अवाक् होऊन जाते. कारण तिच्या बॉयफ्रेंडने तिला वाढदिवसासाठी एकदम जबरदस्त हटके सरप्राइज दिलं. त्याने तिचे वेगवेगळे फोटो टाइम्स स्क्वेअरवर असलेल्या मोठ्या स्क्रिनवर लावले होते. त्याचं हे अनोख आणि हटके सरप्राइज पाहून गर्लफ्रेंड आनंदाने भारावून गेली. 


हेसुद्धा वाचा - Video Viral : रुसलेल्या गर्लफ्रेंडसाठी तिच्या घरासमोरच प्रियकरानं गायलं गाणं; तिला दुसऱ्या तरुणाच्या मिठीत पाहून...


सोशल मीडियावर चर्चा 


हा व्हिडीओ पाहून सर्वत्र फक्त या तरुणाचीची चर्चा होते आहे. 



हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील tales_by_lekha या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी तिला इतकं भन्नाट सरप्राईज पाहून तिचा आनंद गगणात मावत नव्हता. खरं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं तिलाही असं कोणीतरी सप्रराईज द्यावं. खास करुन वाढदिवस...हा प्रत्येकासाठी खूप खास असतो. प्रेमात असताना बायफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला असं भन्नाट आणि जबरदस्त सप्रराईज द्यायला आवडतात. प्रेमातील प्रत्येक क्षण खास करायचा आणि ती आठवण कायम मनात साठवूण ठेवायची...सोशल मीडियामुळे आता या क्षणाचे मस्त फोटो आणि व्हिडीओद्वारे ते आपल्यासोबत असतात.