मुंबई : लोकं असे नेहमी म्हणतात की, नशीब एक मोठी गोष्ट आहे. कोणाचं नशीब कधी बदलेल किंवा त्या व्यक्तीला त्याचं नशीब किती आणि कशी साथ देईल हे कोणाला माहित नाही. काहींचे नशीब इतके वाईट असते की, त्याच्या सोबत न होणारी गोष्ट देखील त्याच्या सोबत घडते. तर काहींचे नशीब इतकी चांगले असते की, बस रे बस.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. कारण यामध्ये एका माणसाचा जिव वाचला आहे. परंतु तो असा काही वाचला आहे की, याची तुम्ही कल्पना देखील करु शकत नाही. आम्ही असे का म्हणत आहे यासाठी तुम्ही हा व्हिडीओ एकदा पाहाच, तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. हा खूप थरार अनुभवणारा व्हिडीओ आहे.


ते म्हणतात ना 'दव तारी त्याला कोण मारी' तसेच काहीसे या व्यक्तीसोबत घडले आहे. या घटनेवर विश्वास ठेवणे कठीण असू शकते. कारण, ही परिस्थितीच तशी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की काय झाले हे पाहाण्य़ासाठी 3-4 वेळा तरी तो व्हिडिओ प्ले करुन पाहाल.


या व्हिडीओमध्ये तुम्हा पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला अगदी आरामात चालत आहे. तेवढ्यात त्याच्या पाठीमागून एक बस वेगाने येत आहे. त्या बसवर त्याच्या चालकाचा कंट्रोल सुटला असल्याने ती बस त्या रस्त्यात चालत असलेल्या व्यक्तीला जोरदार धडक देते. तेव्हा तुम्हाला वाटेल की, या व्यक्तीचे आता काही खरे नाही. तो आता गेलाच. परंतु पुढच्या क्षणी असे काही तरी घड़ते की, ते पाहून तुम्ही म्हणाल, 'नशीब म्हणजे हेच' कारण इतकी मोठी धडक लागून देखील हा  व्यक्ती स्वत:च्या पायावर उभा रहातो आणि आपल्या वाटेने चालू लागतो.



याघटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर @RexChapman या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.


आतापर्यंत चार लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याप्रत्येकाने त्यांचा श्वास रोखून हा व्हिडीओ पाहिला असणार, त्यामुळेच यूझर्स त्यांचे मत या व्हिडीओवर कमेंट्स करुन मांडत आहेत.