VIDEO: हेलिकॉप्टरमधून सगळं रेकॉर्ड होत जमिनीवर पडला मोबाईल; शेवटचा सीन पाहून वाटेल आश्चर्य
Viral Video : इंटरनेटवर एक जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे ज्यामध्ये एक कॅमेरा हेलिकॉप्टरमधून पडताना दिसत आहे. जमिनीवर मोबाईल पडल्यानंतर थोड्या वेळाने, एक जिज्ञासू डुक्कर तिथे येतो आणि ती वस्तू खाण्यायोग्य आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करते.
Viral Video : सध्याचं जग हे तंत्रज्ञानाचे जग आहे. आपण सगळेच तंत्रज्ञानाशी जोडले आहोत. पण मोबाईलमुळे सगळं अधिकच जग आपल्या जवळ आलंय. मोबाईलमध्ये असलेल्या फोटो आणि व्हिडिओ फिचरमुळे आपल्या जवळचे अविस्मरणीय क्षण आपल्याजवळ साठवून ठेवता येतात. जे लोक सतत फिरतीवर असतात अशा लोकांना आपल्या आसपासचे क्षण मोबाईलमधील असलेल्या कॅमेराच्या साहाय्याने साठवायचे असतात. पण हे क्षण मोबाईलमध्ये टिपताना काही दुर्घटना सुद्धा घडतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हेलिकॉप्टरमधला आहे. या व्हिडिओत हेलिकॉप्टरमधून बाहेर दिसणारं दृश्य रेकॉर्ड झालंय. पण व्हिडिओच्या शेवटी काही असे क्षण रेकॉर्ड झालेत जे पाहून तुम्हाला धक्का नक्कीच बसेल.
व्हिडिओत काय?
हवेत प्रवास करत असताना, प्रत्येकाला ढगांचे सुंदर आकार किंवा उंच आकाशातून दिसणारी जमीन कॅप्चर करणे आवडते. त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये एक व्यक्ती आपल्या कॅमेराने सुंदर दृश्ये टिपत होता. पण त्यानंतर अचानक त्याचा कॅमेरा जमिनीवर पडतो आणि पुढे जे घडते ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत काही लोक हेलिकॉप्टर मध्ये बसले आहेत. तर त्या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी एकाने आपल्या मोबाईलमधून काही क्षण साठवण्यासाठी व्हिडिओ काढायला सुरुवात केली. पण हवा जास्त असल्याच्या कारणानं त्याला मोबाईल नीट पकडता आला नाही. त्यामुळे तो मोबाईल हातातून सुटून खाली पडला. जेव्हा मोबाईल हातातून निसटला तेव्हा तो जंगलात पडला.
पण रेकॉर्डंग सुरु असताना मोबाईल पडल्यामुळे त्यामध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झाल्या. जेव्हा फोन खाली पडतो तेव्हा तिथे एक डुक्कर येतं. त्या दरम्यान डुकराने सुरुवातीला मोबाईलचा वास घेतला. त्यानंतर ते डुक्कर मोबाईल खाण्याचाही प्रयत्न करतो. हे सगळं सुरु असताना मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डींग सुरु असते.
आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक युजर्स मजेशीर कमेंट्स करत आहेत. तर काहींनी या व्हिडीओवरुन शंका उपस्थित केली आहे. एक युजरने विचारले की, इतक्या वरुन पडल्यावरसुद्धा फोन कसा तुटला नाही. तर काही लोकांनी विचारलं की, मोबाईला फुग्याला बांधला होता? या व्हिडिओला आतापर्यंत 51 हजार लोकांनी लाईक्स केले आहेत तर असंख्य लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.