Viral Video: आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेकवेळा जेवण ऑनलाईन ऑर्डर (Online Food Order) करतो. काही वेळा हॉटेलमधलं रुचकर जेवण खाण्याची इच्छा होते, तर काही वेळा नोकरीधंद्यातून जेवण करायला वेळ मिळत नसल्याने आपण जेवण ऑनलाईन ऑर्डर करतो. सध्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारे अनेक अॅप मोबाईलवर (Mobile App) उपलब्ध आहेत. शहराच्या कोणत्याही टोकाला असणाऱ्या हॉटेलमधून तुम्हाला घरपोच जेवण उपलब्ध करुन दिलं जातं. डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) अगदी कमी वेळेत जेवण आपल्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या मेहनतीलाही आपण अनेकवेळा दाद देतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण काही डिलिव्हरी बॉय याला अपवाद असतात. जेवणाची डिलिव्हरी देताना त्यातलं काही जेवण खात असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. पण एका डिलिव्हरी बॉयने तर घाणेरडेपणाचा कळस गाठला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्सने चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्या डिलिव्हरी बॉयला चांगलीच अद्दल घडवण्याची मागणीही युजर्स करतायत.


ही घटना अमेरिकेतल्या फ्लोरिडामधली आहे. व्हायरल व्हिडिओत एका डिलिव्हरी बॉय जेवणाचं पार्सल एका घरात डिलिव्हरी करतो. घराच्या व्हरांड्यात तो जेवणाचं पार्सल ठेवतो. त्यानंतर इथे-तिथे बघून तो त्या जेवणाच्या पार्सलवर चक्क थुंकतो. एकदा नाही तर दोन ते तीन वेळा तो डिलिव्हरी बॉय थुंकताना या व्हिडिओत दिसतोय.


सीसीटीव्हीत घटना कैद
घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत ही किळसवाणी घटा कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ग्राहकाला धक्काच बसला. त्याने सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल केला. यावर लोकांच्यी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 


काय केलं त्याने असं
ग्राहकाने केलेल्या दाव्यानुसार ग्राहकाने त्या डिलिव्हरी बॉयला 3 डॉलरची (भारतीय रुपयात 250 रुपये) ऑनलाईन टीप दिली. पण इतकी कमी टीम दिल्याने डिलिव्हरी बॉय नाराज होता. त्याला चांगल्या टीपची अपेक्षा होती. पण या पेक्षा जास्त टीम देण्यास ग्राहकाने नकार दिल्याने डिलिव्हरी बॉय ग्राहकाच्या जेवणाच्या पार्सलवर थुंकला.



कंपनीने घेतली गंभीर दखल
एका तेरा वर्षांच्या मुलाने आणि त्याच्या आईने हे जेवण ऑर्डर केलं होतं. त्यांनी आपल्या डोअरबेल कॅमऱ्यात डिलिव्हरी बॉयचा किळसवाणा प्रकार पाहिला. 30 डॉलर खर्च करत या मायलेकांनी जेवण ऑर्डर केलं होतं. यावर डिलिव्हरी बॉयला तीन डॉलरची टीप दिली. पण यानंतर ही डिलिव्हरी बॉयने हे कृत्य केलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीने याची गंभीर दखल घेत त्या डिलिव्हरी बॉयला कामावरुन काढून टाकलं.