लंडन : सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या देखील अंगावर काटा उभा रहिल हे नक्की. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पाळणा दिसत आहे. ज्यामध्ये लोकं पाळण्यात झुलण्याचा आनंद घेत असतात. परंतु बघता बघता हा पाळणा तुटतो आणि त्याच्या मुळापासून पडायला येतो. हा पूर्ण मृत्यूचा थरार सुरू असतो, तेव्हा एक व्यक्ती आपली युक्ती वापरतो. ज्यामुळे या पाळण्यात बसलेल्या जवळजवळ 15 ते 20 लोकंचे प्राण वाचते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरवातीला तो पाळणा तुटला हे पाहून तिथे उभे असलेले लोकं घाबरून गेले. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमेरिकेच्या मिशिगन येथील ट्रॅव्हर्स सिटी येथील नॅशनल चेरी फेस्टिव्हलमध्ये ही घटना आहे.


अहवालात असे म्हटले गेले आहे की, शुक्रवारी पहाटे या पाळण्यातील लोकांना बाहेर काढले गेले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.  परंतु ट्विटरवर या थरारक क्षणाचा व्हिडीओ पाहून लोकांनी याला खूप शेअर केले.


सुदैवाने, तिथे उपस्थित लोकांनी हा पाळणा पडताना पाहताच ताबडतोब जाऊन त्याचा पाया धरला, हे पाहून दुसरे लोकं देखील तेथे जमा झाले आणि त्या सगळ्यांनी ते रेलिंग धरुन ठेवले. ज्यामुळे अनेकांचे जीव वाचवण्यात यश आले.



चेरी फेस्टिव्हलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बर्‍याच लोकांनी हा भयानक क्षण त्यांच्या फोनमध्ये कैद केला. या व्हिडीओवर आतापर्यंत साडेचार लाख views आले आहेत. जवळपासच्या रेकॉर्डवरुन नोंद केलेला दुसरा छोटा व्हिडीओ अत्यंत भयानक आहे.