Spider Man During President Speech: देशाचे राष्ट्रपती जेव्हा भाषणासाठी उभे राहतात, तेव्हा बरेच शिष्ठाचार पाळले जातात. राष्ट्रपतींच्या भाषणावेळी इतकी शांतता असते, की साधी टाचणी पडली तरीही तिचा आवाज स्पष्ट ऐकू येईल. कारण या पदाला संवैधानिक महत्त्वं आहे. कारण, राष्ट्रपती म्हणजे देशाचे पहिले नागरिक असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक देशात राष्ट्रपती आणि या पदासंबंधीचे नियम वेगवेगळे. पण, पदाचं महत्त्वं मात्र समसमान. अशाच एका राष्ट्रपतींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथं त्यांच्याऐवजी दुसरंच कुणीतरी लक्ष वेधत आहे. हे कुणीतरी म्हणजे राष्ट्रपतींभोवती घिरट्या घालणारा एक चिमुकला.


Chile President Gabriel Boric:


चिलीचे राष्ट्रपती  गेब्रियल बोरिक यांनी नुकतंच एक जनमत संग्रहात मतदान करण्यासाठी आवाहन केले कि एक दूरगामी नवीन संविधानाचा स्वीकार केला तर दक्षिण अमेरिकी देश मौलिक रुपात बदलतील. राष्ट्रपतींचं हे भाषाण सुरु असतानाच तिथं Spider Man च्या रुपात एक लहान मुलगा आला आणि तो फिरु लागला. बरं या भाषणाचं Live telecast सुरु होतं. पण, त्या चिमुकल्याला याच्याशी काही घेणंदेणं नव्हतं.  



तो मुलगा आला, त्यानं सायकलनं फेऱ्या मारल्या पुढे काही वेळासाठी तो राष्ट्रपतींची भाषण ऐकू लागला आणि परत त्यानं आपली सायकल चालवण्यालाच प्राधान्य दिलं. लहान मुलं ही अशीच असतात. कुठे काही घडो, ती मात्र त्यांच्याच विश्वात रममाण झालेली असतात. डावपेच, संघर्ष, मतभेद या साऱ्यापासून ती कैक मैल दूर असतात आणि यामुळंच ती निरागस असतात.