Viral Video : 35 हजार फूट उंचीवर उडत होते विमान; प्रवाशाला खिडकीतून दिसले एलियन
सोशल मिडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने व्हिडिओमध्ये UFO कॅप्चर केले आहेत.
Alien : एलियन खरचं आहेत का? की एलियन म्हणजे नुसता कल्पना याबाबत अनेक तर्क वितर्क मांडले जातात. अनेकजण एलियन असल्याचे दावा करतात. असाच दावा एका प्रवाशाने केला आहे. 35 हजार फूट उंचीवर विमान उडत असताना विमानाच्या खिडकीतून एलियनचे UFO पाहिल्याचा दावा एका प्रवाशाने केला आहे.
UFO अर्थात Unidentified flying object याच्या संबधीत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिमध्ये विमान प्रवाशाने UFO कॅप्चर केले आहेत. विमान 35 हजार फूट उंचीवर उडत असताना UFO दिसले. या UFO मधून एलियन प्रवास करत असल्याचा दावा व्हिडिओ कॅप्चर करणाऱ्या प्रवाशाने केला आहे.
डेली स्टार न्यूज वेबसाइटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बोगोटा शहरातून कोलंबियातील सेलेंटो शहराकडे जात असलेल्या विमानातून हा प्रवासी प्रवास करत होता. द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार , ही क्लिप स्पॅनिश फोरम फोरोकोचेसने देखील शेअर केली आहे.
काही लोकांनी हे UFO नसून ड्रोन असल्याचा दावा केला. मात्र, ड्रोन इतक्या उंच उडू शकत नाहीत. यामुळे हे UFO चं असल्याचा दावा केला जात आहे. प्रचंड वेगाने हे UFO पुढे जात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
नासाच्या यूएफओ रिपोर्टमध्ये एलियन्सबाबत मोठा खुलासा
मेक्सिकन संसदेत एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ सादर केल्यानंतर नासाने एक अहवाल जारी केला होता. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या यूएफओवर आधारित अहवालावर संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. या रिपोर्टमध्ये एलियन्सबद्दल एक मोठा खुलासा करण्यात आलाय. सुमारे एक वर्ष UFO म्हणजेच अन-आयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्टचा अभ्यास केल्यानंतर नासानं हा अहवाल जारी केला आहे. नासाच्या या 33 पानांच्या अहवालात यूएफओ हे आपल्या ग्रहाचे सर्वात मोठं रहस्य असल्याचं वर्णन करण्यात आले. पृथ्वीशिवाय विश्वातही एलियन्स असल्याचा अहवाल जारी केला होता. त्यामुळे अंतराळात एलियन्सचं अस्तित्व आहे असं बोललं जात आहे. एलियन्स किंवा यूएफओ आपल्या एयर ट्रॅफिक मॅनेजमेंटमुळे अवकाशात होणा-या एखाद्या बदलाचा परिणाम असतील, असंही नासाने म्हटल आहे.